कानगावला विलगीकरण कक्ष सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:12 AM2021-05-12T04:12:33+5:302021-05-12T04:12:33+5:30
सध्याच्या परिस्थितीत कानगाव व परिसर कोरोनाच्या आजारापासून खूप त्रस्त झालेला आहे. गावामध्ये बऱ्यापैकी रुग्ण कोरोनाबांधित असून ...
सध्याच्या परिस्थितीत कानगाव व परिसर कोरोनाच्या आजारापासून खूप त्रस्त झालेला आहे. गावामध्ये बऱ्यापैकी रुग्ण कोरोनाबांधित असून ही बाब चिंताजनक आहे. रुग्णासाठी कोविड विलगीकरण कक्ष सुरू करणे अंत्यत गरजेचे असून विलगीकरण कक्ष सुरू केल्याने कोविडच्या प्रादुर्भावापासून ग्रामस्थांचा बचाव होण्यास मदत होणार आहे. विलगीकरण कक्ष सुरू न केल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यास आणि त्यामुळे रुग्णाची जीवित्तहानी झाल्यास त्यास ग्रामपंचायत प्रशासन सर्वस्वी जबाबदार असाल यांची नोंद घ्यावी व लवकरात लवकर कोविड विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. या निवेदनावर पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणीस ज्ञानेश्वर शेळके, कानगाव ग्रामपंचायत सदस्य शरद चौधरी, माजी सदस्य भाऊसाहेब फडके याच्या सह्या आहेत.