वाघोली-राहू पीएमपीएमएल बस पारगावपर्यंत सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:16 AM2021-02-17T04:16:25+5:302021-02-17T04:16:25+5:30
पारगावची लोकसंख्या तेरा हजारांच्या दरम्यान असून पारगाव पंचक्रोशीतील नागरगाव, रांजणगाव, नानगाव, खोपोडी, गलांडवाडी गावे असून, पारगाव पंचक्रोशीतील या सर्व ...
पारगावची लोकसंख्या तेरा हजारांच्या दरम्यान असून पारगाव पंचक्रोशीतील नागरगाव, रांजणगाव, नानगाव, खोपोडी, गलांडवाडी गावे असून, पारगाव पंचक्रोशीतील या सर्व गावांना या बस सेवेचा फायदा होणार आहे. पारगावमधील विविध सहकारी संस्थांनी व ग्रामस्थांनी पारगाव पर्यंत पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याची मागणी केलेली आहे. माजी आमदार रमेश थोरात यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांना राहूपर्यंतची बससेवा पारगाव सालु-मालुपर्यंत सुरू करण्यासाठी लेखी व फोनद्वारे आग्रही मागणी केली आहे.
देलवडी ग्रामपंचायतीने यासंदर्भात लेखी निवेदन दिल्याची माहिती सरपंच नीलम काटे यांनी दिली. या बससेवेचा फायदा पिंपळगाव, देलवडी व पारगाव परिसरातील लोकांना होणार असून, परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार व प्रवासी यांना या बससेवेचा फायदा होणार आहे. याबाबतचे निवेदन पीएमपीएमएल व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र झेंडे यांना देण्यात आले आहे. यावेळी पोपटराव ताकवणे शांताराम बांदल, सोपानराव गायकवाड उपस्थित होते.
--
फोटो क्रमंक: १६ केडगाव बससेवा सुरु
फोटो ओळी पीएमपीएमएलचे व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र झेंडे यांना निवेदन देताना पोपटराव ताकवणे व मान्यवर.