सुलतानपूर बंधाऱ्याची गळती थांबवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:12 AM2021-02-16T04:12:43+5:302021-02-16T04:12:43+5:30
उन्हाळ्यामध्ये गावातील नागरिकांना पाण्याची कमतरता होऊ नये, यासाठी बंधाऱ्याची गळती थांबवणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये मंचरकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावू नये ...
उन्हाळ्यामध्ये गावातील नागरिकांना पाण्याची कमतरता होऊ नये, यासाठी बंधाऱ्याची गळती थांबवणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये मंचरकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावू नये यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच किरण राजगुरू, उपसरपंच युवराज बाणखेले, ज्योती निघोट, विशाल मोरडे, दीपाली थोरात, सुप्रिया राजगुरव, वंदना बाणखेले, सविता क्षीररसागर, श्याम थोरात, रंजना आतार, सतीश बाणखेले, ज्योती थोरात, ज्योती बाणखेले, पल्लवी थोरात, कैलास गांजाळे, अरुण बाणखेले, माणिक गावडे या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सुलतानपूर येथील बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी बंधाऱ्याला सुरू असलेल्या गळतीवरून पाटबंधारे विभागाला गळती थांबवण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, आगामी उन्हाळ्यात मंचरकरांना योग्य पाणी पुरवठा करण्यासाठी चर्चा करून योग्य ते पुढील कामाचे नियोजन ठरवले जाईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे यांनी दिली.