दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:10 AM2021-05-09T04:10:50+5:302021-05-09T04:10:50+5:30
यासंदर्भात, ताकवणे म्हणाले की, रेणुका देवी दूध संस्थेच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षांपासून दूध व्यवसायामध्ये आहे. सध्या दुधाचे दर कोसळल्यामुळे ...
यासंदर्भात, ताकवणे म्हणाले की, रेणुका देवी दूध संस्थेच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षांपासून दूध व्यवसायामध्ये आहे. सध्या दुधाचे दर कोसळल्यामुळे दुग्ध व्यवसायिकांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. लॉकडाऊनमुळे दूधच खपत नसल्यामुळे दुधाचा दर १७ ते १८ रुपये प्रतिलिटर आलेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये दूध दर २९ ते ३० रुपये प्रति लिटर होता. त्या वेळी शेंगदाणा पेंड, भुस्सा व सरकी पेंड यांचे दर माफक दरामध्ये होते. भुसा पोते ७०० ते ७५० रुपये, शेंगदाणा पेंड २००० हजार रुपये व सरकी पेंड १००० ते ११०० रुपये या दराने मिळत होती. गेल्या महिनाभरापासून प्रत्येक पोत्यामागे ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसत आहे. एकीकडे दुधाचे दर प्रति लिटर सरासरी दहा रुपये कमी झाले असताना गोळी भुसा व सरकी पेंड यांचे दर मात्र वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे गणित मात्र कोलमडले आहे. सध्या रेणुका देवी दूध संस्थेमध्ये दोन हजार लिटर दूध संकलन होत असून संस्था तोट्या भावामध्ये सभासदांना दूध दर देत आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, थंडपेय ,लग्नसराई बंद असल्याने दुधाला उठाव नाही त्यामुळे आपोआपच दुधाचा खप कमी झाला आहे. त्यामुळे संघाच्या मार्फत भेसळीच्या नावाखाली दूध कमी रेटने घेतले जाते. याचा फटका सहकारी दूध संस्थांना बसत आहे. त्यामुळे शासनाने प्रति लिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या किंवा संस्थेच्या नावे जमा करावे, अशी माहिती पोपटराव ताकवणे यांनी केली आहे.