बारामती तालुक्यात टँकरची मागणी घटणार?, जलयुक्त शिवार अभियानामुळे पाणीपातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:09 AM2018-03-13T01:09:52+5:302018-03-13T01:09:52+5:30
मागील वर्षी बारामती तालुक्यात परतीच्या पावसाने चांगली साथ दिली. या पावसामुळे जिरायती भागात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे पाणीसाठा चांगला झाला होता. त्यामुळे येथील विहिरींच्या भूजलपातळीत वाढ झाली.
बारामती : मागील वर्षी बारामती तालुक्यात परतीच्या पावसाने चांगली साथ दिली. या पावसामुळे जिरायती भागात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे पाणीसाठा चांगला झाला होता. त्यामुळे येथील विहिरींच्या भूजलपातळीत वाढ झाली. सध्या देखील येथील विहिरींची पाणीपातळी टिकून आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात बारामतीच्या जिरायती भागातून टँकरची मागणी घटण्याची शक्यता आहे.
बारामती तालुक्यात २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ८०४ पैकी ६९९ कामे पूर्ण करण्यात आली. जिरायती भागातील ओढे, नाले, खोलीकरणाबरोबरच माती बंधारे, सिमेंट बंधारे व बांधबंदिस्तीची कामे पूर्ण करण्यात आली. या पूर्ण झालेल्या कामांना मागील वर्षी वरुणराजाचा देखील आशीर्वाद लाभला. परतीच्या पावसाने जिरायती भागासह संपूर्ण तालुका व्यापला. परिणामी जलयुक्तच्या कामांमुळे ५ हजार ८६३ टीसीएम पाणीसाठी होण्यास मदत झाली.
एरवी दिवाळी संपताच जिरायती भागातील जनतेवर पाणी-पाणी करण्याची वेळ येते. टँकरच्या मागण्यादेखील जोर धरू लागतात. संपूर्ण उन्हाळाच येथील जनतेवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. मात्र यंदाच्या वर्षी मार्च महिनापर्यंत पंचायत समितीकडे फक्त उंडवडी कडेपठार येथून टँकर मागणीचा एकमेव प्रस्ताव आल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.
>मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे पूर्ण झालेल्या कामांना परतीच्या पावसामुळे चांगला फायदा झाला. येथील शेती उत्पादनदेखील १५ टक्क्यांपर्यंत वाढले. जिरायती भागातील शेतकºयांनी जलसाक्षर होण्याची गरज आहे. कमी पाण्यावर येणाºया फळबागांकडे येथील शेतकरी वळाल्यास शेतकºयांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
- संतोषकुमार बरकडे, तालुका कृषी अधिकारी, बारामती
मात्र यंदा पुरेशा प्रमाणात विहिरींमध्ये पाणीसाठा असल्याने शेतकºयांनी चारापिकांचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे येथील पशुधनास यंदाच्या उन्हाळ्यात सकस चारा मिळण्यास मदत होणार आहे. जलयुक्तच्या कामांमुळे जिरायती भागातील विहिरींच्या पाणीपातळीत सरासरी १.७२ मीटरने वाढ झाली आहे. त्याचा येथील
२ हजार ६३८ हेक्टरला सिंचनासाठी फायदा
झाला आहे.