पुणे महापालिका हद्दीतील तीनही कँटोन्मेंट बोर्ड महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 03:05 PM2018-01-29T15:05:51+5:302018-01-29T15:07:36+5:30
महापालिकेच्या हद्दीत असलेल्या पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्डामध्ये सध्या अनेक मुलभूत, पायाभूत सुविधापासून नागरिक वंचित आहेत.
पुणे : महापालिकेच्या हद्दीत असलेल्या पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्डामध्ये सध्या अनेक मुलभूत, पायाभूत सुविधापासून नागरिक वंचित आहेत.
पाणी, ड्रेनेज, लाईट, घरांची दुरुस्ती, घराचा मालकी हक्क, एफएसआय आणि वारसा हक्क नोंद, घरगुती तसचे व्यवसायिक मालमत्ता, स्क्वेअर फुटावर कर प्रणालीमध्ये असलेली तफावत आहे. याशिवाय महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना मिळणाऱ्या वैद्यकीय, शैक्षणिक मदत, महिला बचत गट आर्थिक सहाय्य, रोजगार आदी अनेक सुविधांपासून नागरिकांना वंचित रहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील तिन्ही कँटोन्मेंट बोर्ड महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.