डोर्लेवाडीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार निवेदनाद्वारे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:13 AM2021-08-29T04:13:04+5:302021-08-29T04:13:04+5:30

डोर्लेवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवकाते यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने थेट उपमुख्यमंत्री ...

Demand through complaint statement to the Deputy Chief Minister against the medical officers of Dorlewadi | डोर्लेवाडीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार निवेदनाद्वारे मागणी

डोर्लेवाडीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार निवेदनाद्वारे मागणी

Next

डोर्लेवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवकाते यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. बारामती येथे उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करावी, असे निवेदन उपमुख्यमंत्री पवार यांना दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनानुसार, डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजासंदर्भात गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे दैनंदिन कामाकाजामध्ये विस्कळीतपणा आलेला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याठिकाणी सामान्य गोरगरीब नागरिक जात असतात; परंतु नागरिकांना या ठिकाणी योग्य वागणूक दिली जात नाही. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणारी डोर्लेवाडी, झारगडवाडी, सोनगाव, गुणवडी, मळद ही गावे कोरोना हॉटस्पॉट झाली आहेत. मात्र, तरीही येथे लसीकरणामध्ये वशिलेबाजीमुळे सावळा गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवकाते यांचे पती डॉ. बापूराव दडस देखील या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील नागरिकांना लस न देता बाहेरील गावातील व कंपनीतील लोकांना पैसे घेऊन लस देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. गावातली लसीकरण कमी झाल्यामुळे कोविड रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. हे वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनादेखील दुय्यम दर्जाची वागणूक देत आहेत. ‘आमचं कोणीही काहीही करू शकत नाही. आमची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सीइओ साहेब यांच्याकडे तक्रार करा’ असे ते वारंवार म्हणत असतात.

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेली १०-१२ वर्षांपासून अधिक काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून हे पती-पत्नी कार्यरत आहेत. त्यांची बदली करण्याबाबत ५ ऑक्टोबर २०१८ च्या ग्रामसभेमध्ये ठराव देखील करण्यात आलेला आहे. वारंवार पत्रव्यवहार करून देखील या दाम्पत्याची बदली होत नाही, अशी तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी सरपंच पाडुरंग सलवदे, सदस्य रामभाऊ कालगावकर, शहाजी दळवी, दिगंबर भोपळे आदी प्रमुख ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Demand through complaint statement to the Deputy Chief Minister against the medical officers of Dorlewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.