पोखरी येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृह मागणीची राज्यपालांकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:11 AM2021-03-18T04:11:48+5:302021-03-18T04:11:48+5:30
पोखरी(ता.आंबेगांव) हे आंबेगांव तालुक्याच्या अनुसुचित क्षेत्रातील गांव असून येथे इ ५ वी ते १२ वी पर्यंतच्या महाविद्यालयीन शिक्षणाची सोय ...
पोखरी(ता.आंबेगांव) हे आंबेगांव तालुक्याच्या अनुसुचित क्षेत्रातील गांव असून येथे इ ५ वी ते १२ वी पर्यंतच्या महाविद्यालयीन शिक्षणाची सोय आहे. सन २०१९ पासून येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठांतर्गत वरीष्ठ महाविद्यालयास राज्य शासणाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे येथे दरवर्षी जवळ पास एक हजारच्या आसपास आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी प्रविष्ठ होत आहेत. हे सर्व विद्यार्थी खेड आंबेगांव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी गावांतून दाखल होत असून त्यातील ९० टक्के विद्यार्थी हे आदिवासी आहेत. यामध्ये मुलींची संख्या ही मोठी आहे. दुर्गम डोंगर दऱ्याखोऱ्यांचा भाग व दळण वळणाच्या सोयी नसल्याने या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्यातच उच्च शिक्षणासाठी दाखल होणाऱ्या विद्यार्थीनींची वसतीगृहा अभावी मोठ्या प्रमाणात गैर सोय होत असल्याची माहीती शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कोळप व सचिव जनार्दन आंबेकर(गुरूजी) यांनी सांगीतले.
पोखरी येथे आदिवासी विकास विभागाचे वसतीगृह सुरू व्हावे यासाठी संस्थेमार्फत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. येथे वसतीगृह सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव घोडेगाव प्रकल्पाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावावर शिफारस करून प्रकल्प कार्यालयाने हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे यांच्याकडे पाठविला आहे.