आलेगाव पागा परिसरात पाणीटंचाई, चासकमान चारीद्वारे पाणी सोडण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 01:39 AM2018-11-08T01:39:57+5:302018-11-08T01:40:23+5:30

आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे व परिसरातील शेंडगेवाडी, तलाव पिंपळदऱ्याच्या ओढ्यातील शेतकरीवर्गास भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

 Demand for water drainage in Gelgaona Paga area, water supply through Chasman Chana | आलेगाव पागा परिसरात पाणीटंचाई, चासकमान चारीद्वारे पाणी सोडण्याची मागणी

आलेगाव पागा परिसरात पाणीटंचाई, चासकमान चारीद्वारे पाणी सोडण्याची मागणी

googlenewsNext

रांजणगाव सांडस : आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे व परिसरातील शेंडगेवाडी, तलाव पिंपळदऱ्याच्या ओढ्यातील शेतकरीवर्गास भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच उरळगाव, तांबेवस्ती, कोळपेवस्ती, सत्रासवस्ती, गिरीमकर वस्ती या भागात ही भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
घोगर ओढा या भागात ही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातून चासकमानचा कॅनॉल गेलेला असून त्यातील पोटचाºया पाण्याविना वर्षानुवर्षे रिकाम्याच आहेत. पाणी येते ते फक्त पावसाळ्यातच. चासकमानचे शेरे सात-बारा उताºयावर आले. पण त्याच शेतकºयांना पाणी नाही. चार वर्षांपूर्वी या भागातील शेंडगेवाडी तलाव आटलेला असून या भागात शेळ्या-मेंढ्यांनाही पाणी मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. या भागातील विहिरी, बोअरवेल्स यांना पाणीच वर येत नाही, तर शेतातील पिके कशी जगवायची. या भागातील ऊसपिक हे हमखास उत्पादन मिळवून देणारे असून पाणी नसल्याने उसाचे चिपाड झाले आहे. ज्वारीच्या पिकांनी माना (सुकून गेलेल्या) टाकलेल्या आहेत. पाऊस पडेल, या आशेवर पेरणी केल्या पुन्हा दुहेरी पेरण्या केल्या, पण पाऊस नाही चासकमानच्या कॅनॉलचे आवर्तन या भागात सोडले नाही. जर या भागात चासकमानचे आवर्तन सोडून शेंडगेवाडी तलाव भरला असता तर या भागांतील विहिरी बोअरवेल्स यांना पाणी आले असते.

खेडशिवापूरला पाणीटंचाई
खेडशिवापुर / वेळू : पावसाळ्यातील कमी पर्जन्यमान तसेच परतीच्या पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे शिवगंगा खोºयातील शेतकरी हवालदिल आहे. ज्वारी व गहू याच्या पेरण्यांवर दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या पिकांच्या एकूण क्षेत्रापैकी २० टक्क्यातही पेरणी झाली नसल्याचे दिसून येत आहे. ओढे-नाले सुकले आहेत, तर विहिरीचं पाणी डिसेंबरअखेरपर्यंत पुरेल की नाही, यात शंका आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न तर आताच गंभीर बनला आहे.

पिंपळगाव जोगा कालव्याचे पाणी
अद्यापही नाहीच
बेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील रानमळा (ता. जुन्नर) गावाला पिंपळगाव जोगा
कालव्याचे पाणी पाच दिवस उलटून गेले तरीही न मिळाल्यामुळे येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
तसेच अधिकाºयांना घेराव घालत पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी पिंपळगाव जोगा कालव्याला पाणी सोडून काही दिवस झालेले आहेत. रानमळा हे गाव दुष्काळी
गाव आहे.

या गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते. येथील महिला हंडा मोर्चा घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एम. एस. बागूल यांना ग्रामस्थ व महिलांनी घेराव घातला व पिंपळगाव जोगा कालव्याच्या मायनर ३१ व ३२ मधून पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी सरपंच सविता तिकोणे, लक्ष्मी गुंजाळ, कविता पाबळे, सविता गुंजाळ, कल्पना गुंजाळ, दादा गुंजाळ, सुरेश तिकोणे, उपसरपंच शंकर गुंजाळ, रोहिदास पाडेकर आदी उपस्थित होते. पाण्याबाबत अधिकारी अन्याय करीत असल्याची भावना आहे.

चासकमानच्या चारी १९ वरून पाणी कोळपेवस्तीवरून शेंडगेवाडी तलावात सोडले तर या भागातील विहिरी बोअरवेल्स यांच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. कमीत कमी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मिटेल अन्यथा पिके जळालेली आहेत. लोकप्रतिनिधींनी या भागात पाणी सोडावे, आगामी काळात ‘अच्छे दिन’ शेतकरी दाखविल्याशिवाय राहणार नाही.
- अशोक कोळपे,
माजी सरपंच, उरळगाव

दौंडच्या दुष्काळी २२ गावांचा पाणीप्रश्न मिटवा
खोर : दौंड तालुक्याच्या जिरायती भागामध्ये पाणीप्रश्न उग्र रूप धारण करू लागला असून, या भागामधील पाणीप्रश्न व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यात
आले आहे. मागील आठवड्यात दौंड तालुक्यातील २२ गावांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी दुष्काळी दौरा केला होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत थोरात यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

दिवाळीवर दुष्काळाचे सावट

निमोणे : निमोणे परिसरात खरीप आणि रब्बी अशा दोन्हीही हंगामात वरुणराजाने पाठ फिरवल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने दिवाळीवर दुष्काळाचे सावट पसरले आहे.
चालू वर्षी या भागामध्ये खरीप हंगाम पेरणीसाठी पाऊसच पडला नाही. त्यामुळे मूग संकरित बाजरी यांची पेरणीच झाली नाही. रब्बी हंगामाच्या सुरुवातीस थोडासा शिडकावा झाला. परंतु, त्यानंतर पाऊस गायब झाल्याने रब्बी हंगामही वाया गेला. माळरानावर गवत नाही, शेतात पीक नाही आणि विहीर व बोअरवेल्स यांना पाणी नाही, अशी सध्या परिसराची अवस्था आहे. घोडधरण आणि चासकमान प्रकल्पाच्या आवर्तनावर थोडीफार हिरवाई तग धरून आहे.
मात्र उसाला हुमणीने आणि कांद्याला ढगाळ हवामानाने त्रस्त केले असून उत्पादनात मोठी घट होत आहे. कांद्याला मार्केटमध्ये उठाव नसल्याने जुन्या कांद्याच्या चाळी अद्याप जागेवरच आहेत. या सर्व घडामोडीत बळीराजा मात्र भरडला जातोय. वीजबिल आणि बँकांच्या व खासगी सावकारांच्या हप्त्यांच्या तगाद्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

तहानलेल्या २२ गावांना कुठल्याही प्रकारचा पाण्याचा सोर्स उपलब्ध नाही. कॅनॉलची उपलब्धता नाही. या गावांना लवकरात लवकर टंचाईच्या विळख्यातून बाहेर काढण्याची गरज आहे. जिल्हाधिकाºयांनी विचार करून या गावांची भूक भागविण्याच्या हालचाली सुरू करून प्रश्न मिटवावा.
- रमेश थोरात, माजी आमदार

Web Title:  Demand for water drainage in Gelgaona Paga area, water supply through Chasman Chana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.