पैसे परत करण्यासाठी तगादा लावला; उपाहारगृह चालकाने उचलले टोकाचे पाऊल, ५ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:35 IST2025-03-20T12:33:37+5:302025-03-20T12:35:39+5:30

व्याजाने पैसे घेतल्यावर उपाहारगृह सुरू करण्यापूर्वी चालकाने आरोपींसोबत करार केला, मात्र कराराची मुदत संपण्यापूर्वी आरोपींनी उपाहारगृहाचा ताबा सोडण्यास सांगितले

Demanded to return money Restaurant owner takes extreme step 5 people booked | पैसे परत करण्यासाठी तगादा लावला; उपाहारगृह चालकाने उचलले टोकाचे पाऊल, ५ जणांवर गुन्हा

पैसे परत करण्यासाठी तगादा लावला; उपाहारगृह चालकाने उचलले टोकाचे पाऊल, ५ जणांवर गुन्हा

पुणे : भाडेतत्त्वावर घेतलेले उपहारगृह सोडण्यास सांगितल्याने एकाने आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. उपाहारगृह चालकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात हडपसरपोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश साखरे (४२, रा. महादेवनगर, मांजरी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या उपाहारगृह चालकाचे नाव आहे. याबाबत साखरे यांची पत्नी दीपाली (३८) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश भालचंद्र घुले (५०), रोहिणी संदीप तुपे (४९), प्रशांत पुजारी (३५), नीलेश उत्तम घाडगे (३२) आणि सचिन जयराम शिंदे (४५, सर्व रा. मांजरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश साखरे यांनी मांजरी भागात उपाहारगृह सुरू केले होते. उपाहारगृह सुरू करण्यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. तसेच काही जणांकडून व्याजाने पैसे घेतले हाेते. उपाहारगृह सुरू करण्यापूर्वी त्यांनी आरोपींसोबत करार केला होता. कराराची मुदत संपण्यापूर्वी आरोपींनी त्यांना उपाहारगृहाचा ताबा सोडण्यास सांगितले. पैसे परत करण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. त्यांच्या त्रासामुळे महेश यांनी १० मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींच्या त्रासामुळे पतीने आत्महत्या केल्याचे दीपाली साखरे, यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक बर्गे करत आहेत.

Web Title: Demanded to return money Restaurant owner takes extreme step 5 people booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.