गोहे तलावाने गाठला तळ, डिंभे धरणातून पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:16 AM2019-02-08T00:16:38+5:302019-02-08T00:18:02+5:30
गोहे पाझर तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. तलवात मोठ्या प्रमाणात साठलेल्या गाळामुळे तलावाची पाणीसाठवण क्षमता कमी झाली असून, तलावातील गाळामुळे पाणीसाठवण क्षमताही कमी झाली आहे.
डिंभे - गोहे पाझर तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. तलवात मोठ्या प्रमाणात साठलेल्या गाळामुळे तलावाची पाणीसाठवण क्षमता कमी झाली असून, तलावातील गाळामुळे पाणीसाठवण क्षमताही कमी झाली आहे. या तलावात डिंभे धरणातून पाणी सोडण्यात यावे ही या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, अद्यापही शेतकºयांच्या या मागणीला यश आले नाही.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील गोहे, मापोली, उपळवाडी, दांगटवाडी, विठ्ठलवाडी, हरीचा अंबा, संगमवाडी हा परिसर एकेकाळी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होेता. परंतु, या ठिकाणी गोहे पाझर तलाव झाल्यापासून या भागाचा चेहरामोहराच बदलून गेला. दुष्काळी भागाचे रूपांतर हरितक्रांतीत होऊन येथील आदिवासी शेतकºयांना सुखाचे दिवस पाहावयास मिळाले आहेत.
यंदा या भागात पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला; मात्र परतीच्या पावसाने लवकर काढता पाय घेतल्याने, या तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे.
तलावाच्या निर्मितीपासून या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने या तलावाची पाणी साठवण क्षमाता अतिशय कमी झाली आहे. तलावाचा पसारा
जरी मोठा वाटत असला, तरी गेल्या चार-पाच वर्षांपासून या तलावात पाणी अतिशय कमी साठत
असल्याचे पाहावयास मिळते.
त्यातच या परिसरात बागायती
पिके घेण्याचे प्रमाणही वाढल्याने पर्यायाने पाणीउपसा देखील
वाढला आहे.
सध्या या तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. तलावाची खोली कमी झाल्याने व सततच्या उपश्यामुळे या तलावातील पाणी यंदा लवकरच दूषित होण्याची चिन्हे आहेत. तलावातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असते. यामुळे पावसाळ्यात तलावात साठलेले पाणी अतिशय झपाट्याने कमी होत असते.
डिंभे धरणातून या तलावात पाणी सोडण्याची या भागातील शेतकºयांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्याबरोबरच या तलावाची गळती थांबवून खोली वाढविण्याची मागणी या भागातील शेतकºयांकडून करण्यात येत आहे. मात्र, वर्षामागून वर्षे उलटून जात असूनही आदिवासी शेतकºयांच्या या मागणीकडे शासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.