कामगारांच्या मागण्यांसाठी फुलगावात ग्रामस्थांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 11:45 PM2019-02-06T23:45:26+5:302019-02-06T23:45:41+5:30

फुलगाव (ता. हवेली) येथे स्थानिक भूमिपुत्रांना प्रिकॉल इंडिया लिमिटेड या कंपनीत कामावर घेण्यासाठी आज ‘ठिय्या आंदोलन’ केले.

For the demands of workers, movement of villagers in Falgaga | कामगारांच्या मागण्यांसाठी फुलगावात ग्रामस्थांचे आंदोलन

कामगारांच्या मागण्यांसाठी फुलगावात ग्रामस्थांचे आंदोलन

googlenewsNext

लोणीकंद : फुलगाव (ता. हवेली) येथे स्थानिक भूमिपुत्रांना प्रिकॉल इंडिया लिमिटेड या कंपनीत कामावर घेण्यासाठी आज ‘ठिय्या आंदोलन’ केले. यामध्ये सुमारे ९० तरुण सहभागी झाले होते. फुलगाव येथील छत्रपती शंभूराजे माथाडी जनरल कामगार संघटना व ग्रामस्थांच्या वतीने प्रिकॉल कंपनीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन पाणी वापरून कंपनी उभारण्यात आल्या; पण ७ महिने उलटूनही या कामगारांना कामावर घेण्यास कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. याबाबत, कामगारांना कामावर घेण्यासाठी शंभूराजे माथाडी जनरल कामगार संघटनेने कंपनी व्यवस्थापनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. या पत्रव्यवहाराला कंपनीने कोणतीही दाद न देता दखल घेतली नाही. त्यामुळे फुलगाव ग्रामस्थ व शंभूराजे माथाडी जनरल कामगार संघटनेने या प्रिकॉल इंडिया लिमिटेड कंपनीविरोधात बेमुदत ‘ठिय्या आंदोलन’ सुरू केले आहे. यामध्ये जोपर्यंत या कंपनीने कामगार कामावर रुजू करून घेत नाही, तोपर्यंत हे बेमुदत ठिय्या आंदोलन थांबणार नाही, या कंपनीने ग्रामस्थांची व या कामगार संघटनेची मागणी पूर्ण केली नाही तर यापुढेही तीव्र आंदोलन छेडले जाणार असून होणाºया दुष्परिणामाला कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहील, असे लेखी निवेदन शंभूराजे कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांनी प्रिकॉल इंडिया लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक नितीन वाघ यांच्याकडे दिले आहे.

याप्रसंगी फुलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मंदाकिनी साकोरे,उपसरपंच राहुल वागस्कर, कांताराम वागस्कर,छत्रपती शंभूराजे माथाडी जनरल कामगार युनियनचे संस्थापक किरण साकोरे, राजेंद्र खुळे, सदस्य वामन खुळे, नयना खुळे, निर्मला वागस्कर,सुशीला वागस्कर, विलास खुळे, सुदाम वागस्कर,विजय साकोरे, सोमनाथ खुळे,पोपट खुळे, शनी देवस्थान अध्यक्ष शामराव कोळपकर, नवनाथ वागस्कर, संभाजी वागस्कर,सोमनाथ गवारे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी येथे लोणीकंद ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या अधिपत्याखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.

या कामगारांना कामावर घेण्याच्या दृष्टीने कंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाकडे आम्ही याविषयी माहिती देऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. - नितीन वाघ, व्यवस्थापक,
प्रिकॉल इंडिया लिमिटेड,फुलगाव

स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी आंदोलन असून गाड्यांची लोडिंग-अनलोडिंगचे काम माथाडी बोर्ड कामगारांना मिळावे. - किरण साकोरे, अध्यक्ष,
छ. शंभूराजे माथाडी कामगार संघटना

Web Title: For the demands of workers, movement of villagers in Falgaga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे