पुण्यात 70 वर्षीय आजींकडे सापडल्या एक कोटींच्या जुन्या नोटा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 09:31 AM2017-07-28T09:31:49+5:302017-07-28T09:33:00+5:30

चलानतून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी चाललेल्या 70 वर्षीय वृद्धेकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत

Demonetize notes of worth one crore seized from 70 year old lady in Pune | पुण्यात 70 वर्षीय आजींकडे सापडल्या एक कोटींच्या जुन्या नोटा 

पुण्यात 70 वर्षीय आजींकडे सापडल्या एक कोटींच्या जुन्या नोटा 

Next

पुणे, दि. 28 - चलानतून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी चाललेल्या 70 वर्षीय वृद्धेकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गीता शहा असे या 70 वर्षीय वृद्धेचं नाव आहे. जप्त केलेल्या नोटा प्राप्तिकर विभागाकडे सोपवण्यात येणार असून आणि पुढील चौकशी प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येईल , अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गीता शहा या इस्टेट एजंट आहेत. गीता शहा जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला होता. गीता शहा रिक्षातून एफसी रोडवर पोहोचल्या असता पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली. यावेळी त्यांच्याकडे एक कोटींच्या जुन्या नोटा असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्याऐवजी 500 आणि 2000 च्या नोटा चलनात आणण्यात आल्या. आणि आता लवकरच बाजारात 200 रूपयांची नवी नोट येणार आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये 500 आणि 2000 रूपयांची नोट जारी केल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) 200 रूपयांची नोट जारी करण्याच्या तयारीत आहे.  दोनशे रूपयांच्या नोटांची छपाई देखील सुरू झाली असल्याची सुत्रांची माहिती आहे. 200 रूपयांच्या नोटा जारी झाल्या तर गेल्यावर्षी जारी करण्यात आलेल्या 2000 रूपयांच्या नोटांनंतरचं हे दुसरं नवं चलन असेल.

गेल्या महिन्यात झालेल्या एका बैठकीत आरबीआयने 200 रूपयांची नोट बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. सध्या चलनात असलेल्या नोटांएवढाच आकार 200 रुपयाच्या नोटांचा असेल.  चलनात आल्यानंतर 200 रुपयांच्या नोटांची कमी भासू नये, यादृष्टीने मोठ्या प्रमाणात छपाई सुरू करण्यात आली असल्याचं समजतंय. 

200 रूपयांची नोट कधी चलनात आणायची याबाबतही सरकारचा निर्णय झाला असल्याची सुत्रांची माहिती आहे. 15 ऑगस्टपूर्वी दोनशे रूपयांची नोट चलनात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोनशे रूपयांच्या नव्या नोटेची छपाई करताना सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पावलं उचलण्यात आली आहेत. दोनशे रूपयांच्या नकली नोटा बाजारात येऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही समजतंय.  

Web Title: Demonetize notes of worth one crore seized from 70 year old lady in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.