प्रात्यक्षिक आले अंगलट आणि डॉक्टर सापडले जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:13 AM2021-07-14T04:13:17+5:302021-07-14T04:13:17+5:30
धनकवडी : भारती विद्यापीठ हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांच्या रूममध्ये छुपे कॅमेरे लावणाऱ्या प्रतिष्ठित डॉक्टर आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली ...
धनकवडी : भारती विद्यापीठ हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांच्या रूममध्ये छुपे कॅमेरे लावणाऱ्या प्रतिष्ठित डॉक्टर आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याने ॲमेझॉनवरून छुपा कॅमेरा असलेला बल्ब खरेदी केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी जाळ्यात सापडला.
६ जुलै रोजी भारती विद्यापीठ कॅम्पस (धनकवडी) या ठिकाणातील महिला डॉक्टरांच्या राहत्या रूममध्ये कोणीतरी बनावट चावीच्या साहाय्याने लॉक उघडून व आतमध्ये प्रवेश केला होता. यानंतर बेडरूम व बाथरूममध्ये छुपा कॅमेरा लावला होता.
तपास पथकाचे अधिकारी नितीन शिंदे व त्यांचा पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेत असताना डॉ. सुजित जगताप यांचेवर संशय आला. ही कारवाई उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, जगदिश खेडकर, सचिन पवार, सर्फराज देशमुख, हर्षल शिंदे, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, योगेश सुळ, योगेश सुळ, सचिन गाडे, नीलेश खोमणे, समीर बगशिराज, शिवदत्त गायकवाड, प्रवीण सपकाळ, गणेश सुतार, तुळशीराम टेंभुर्णे, प्रसाद टापरे व संतोष खताळ यांनी केली आहे.