नायगाव येथे बीबीएफ यंत्राचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:05+5:302021-06-03T04:09:05+5:30
कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बीबीएफ पेरणी यंत्राच्या वापराबाबत माहिती व बीबीएफ पेरणी यंत्राच्या खाली पेरणी क्षेत्र वाढविणे तसेच ...
कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बीबीएफ पेरणी यंत्राच्या वापराबाबत माहिती व बीबीएफ पेरणी यंत्राच्या खाली पेरणी क्षेत्र वाढविणे तसेच जल व मूलस्थानी तंत्रज्ञान अवलंब वाढविणे, पिकांचा उत्पादन खर्च कमी करणे व उत्पन्न वाढवणे तसेच बीबीएफ पेरणी यंत्राचा प्रसार व प्रचार करण्यासाठी या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे पिसर्वे मंडल कृषी अधिकारी दयानंद बनसोडे यांनी सांगितले. बीबीएफ पेरणी यंत्र च्या पेरणी यंत्र जोडणीसाठी लागणारया साहित्याचे तसेच बीबीएफ पेरणी यंत्र जोडणी कश्या पध्दतीने केले पाहिजे प्रत्येक पिकाच्या बियाणे पेरणी करताना कोणत्या चकत्या वापरले पाहिजे. जल व मूलस्थानी तंत्रज्ञान व बीबीफ पेरणी कशा पध्दतीने उपयोगी आहे तसेच बीबीएफ पेरणी यंत्राचे फायदे बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक आर. टी. कांबळे व पिसर्वे मंडल कृषी अधिकारी दयानंद बनसोडे यांनी केले. यावेळी कृषी मंडल अधिकारी जी. डी. वाघमारे, सिद्धेश्वर सोसायटीचे संचालक सिध्देश्वर खेसे, जयराम खेसे, माजी उपसरपंच चंद्रकांत चौंडकर, बाळासाहेब थोरात यांचे सहकार्य मिळाले.
यावेळी कृषी सहायक यू. पी. वाघोले,ए. बी. मोहिते,ए. डी. कदम,माया कदम तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.