घोटवडेत इ-पीक पाहणी प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:13 AM2021-09-07T04:13:06+5:302021-09-07T04:13:06+5:30
सदर योजनेची गाव, तालुका, जिल्हा, विभागनिहाय कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध होणार ...
सदर योजनेची गाव, तालुका, जिल्हा, विभागनिहाय कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाच्या ठराविक पिकासाठी मिळणाऱ्या योजना त्यामधे ठिबक, तुषार सिंचन इत्यादींचा लाभ शेतकऱ्यांना अचूक दिला जाईल. ॲपवर खातेदारांनी नोंदणी एकाच वेळी करून हंगामाप्रमाणे पिकाची माहिती अक्षांश-रेखांशासह काढलेल्या पिकाच्या फोटोसह खातेदारांनी अपलोड करायचे आहेत, मोबाईल ॲपवरून मिळालेल्या पिकाची माहिती अचूकता पडताळून तलाठी पिकाची माहिती आवश्यकतेनुसार दुरुस्त करून नोंदी केल्या जातील, सदर प्रात्यक्षिक शेतावर शेतकऱ्यांसह घोटवडे मंडलअधिकारी राजेंद्र गायकवाड, गाव कामगार तलाठी मनीषा पवार यांनी पाहणी केली. या प्रसंगी सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भीमाजी केसवड ,ग्रामपंचायत सदस्य राजाराम शेळके व खातेदार हजर होते अशी माहिती तलाठी मनीषा पवार यांनी दिली.