शेतकऱ्यांच्या बांधावर कृषिकन्येने दिले प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:14 AM2021-08-15T04:14:36+5:302021-08-15T04:14:36+5:30

घोडेगाव : घोडेगाव येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम कृषिकन्या वैष्णवी शाम राऊत यांनी राबवला ...

Demonstration given by a farmer's daughter on a farmer's dam | शेतकऱ्यांच्या बांधावर कृषिकन्येने दिले प्रात्यक्षिक

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषिकन्येने दिले प्रात्यक्षिक

Next

घोडेगाव : घोडेगाव येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम कृषिकन्या वैष्णवी शाम राऊत यांनी राबवला आहे. या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदड येथील ही विद्यार्थिनी असून तिने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध प्रात्यक्षिके दाखवली. यामध्ये सुक्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया कशी करावी, रोपांची कलमे कशी तयार करावीत, निंबोळी अर्क कसा तयार करावा, जैविक व रासायनिक बीज प्रक्रिया कशी करावी, बोर्डो मिश्रण कसे बनवावे व फवारणी कशी करावी हे प्रात्यक्षिकात करून दाखवले. हे प्रात्यक्षिक अजित काळे यांच्या शेतावर वैष्णवी राऊत हिने करून दाखवले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक कडलक, अरविंद हारदे, नेहा काळे यांचे सहकार्य लाभले.

13082021-ॅँङ्म-ि04 झ्र घोडेगाव येथे अजित काळे यांच्या शेतात प्रात्यक्षिक सादर करताना करण्यासाठी उपस्थित कृषिकन्या वैष्णवी शाम राऊत व इतर.

Web Title: Demonstration given by a farmer's daughter on a farmer's dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.