जनावरांच्या चारा प्रक्रियेविषयी केळदमध्ये प्रात्याक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:11 AM2021-09-27T04:11:02+5:302021-09-27T04:11:02+5:30
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची (ता.कराड) येथे चतुर्थ वर्षात शिकत असलेली वेल्हे तालुक्यातील ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची (ता.कराड) येथे चतुर्थ वर्षात शिकत असलेली वेल्हे तालुक्यातील केळद येथील अश्विनी शिवाजी धुमाळ या कृषीकन्येकडून येथील पशुपालकांना जनावरांच्या पोषण आहाराविषयीचे महत्त्व सांगण्यात आले. पोषण आहाराअभावी जनावरांमध्ये अनेक आजार उद्भवत आहेत. तसेच त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चारा प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. जनावरांच्या चाऱ्यामध्ये कडबा, सुका चारा, तसेच मीठ गुळाचे पाणी, युरिया यांचे एकत्रित मिश्रण करुन शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करुन दाखविले. सध्या कोरोना परिस्थितीमुळे ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे असे कृषीकन्या अश्विनी धुमाळ हिने सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी धुमाळ, तुळशीराम धुमाळ, बचत गटाच्या अध्यक्षा शुभांगी धुमाळ, लता धुमाळ, शांताबाई धुमाळ आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.एस.एम.शिंदे, प्राध्यापक व्ही.व्ही.माने, प्राध्यापक भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रम राबविण्यात आला.