विनोद तावडे यांच्याविरुद्ध निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 01:36 AM2019-01-08T01:36:30+5:302019-01-08T01:36:57+5:30
अमरावती प्रकरण : कोथरूडमध्ये एमआयटी कॉलेजसमोर आंदोलन
कर्वेनगर : अमरावतीमधील एका कार्यक्रमात विद्यार्थ्याला अटक करून मोबाईल जप्त करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज एमआयटी कॉलेजसमोर आंदोलन करण्यात आले. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेच्या वेळी प्रशांत राठोड या विद्यार्थ्याच्या राज्याचे शालेय शिक्षण व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना प्रश्न केला, ‘आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांची इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणाची सोय करून देईल काय?’ यावर विनोद तावडे यांनी ‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर,’ असे अफलातून उत्तर दिले.
अशा प्रकारे प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करून दडपशाहीचा मार्ग अवलंबन करणाºया आणि लोकशाहीस काळिमा फासणाºया हुकुमशाही प्रवृत्तीच्या तावडे यांचा आज एमआयटी कॉलेजे कोथरुड येथे महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहोत. याप्रसंगी एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, पुणे जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, राज्य महासचिव वीरेंद्र सिंहासने, कोथरुड ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर, किशोर मारणे, किरण मारणे, सजंय मानकर, युवराज मदगे, उमेश ठाकुर, राजेंद्र मगर, राज जाधव, प्रफुल्ल पिसाळ, अभिजित पाटील, कुणाल मिसाळ व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
४या प्रकरणाचे चित्रीकरण करणाºया विद्यार्थ्यांना अटक करण्याचे तुघलकी आदेश दिले. प्रसंगी पोलिसांनी मोबाईल हिसकावून विद्यार्थ्याला पोलीस वाहनात डांबून ठेवले. नंतर विद्यार्थ्यांचा वाढता दबाव पाहता त्या विद्यार्थ्याला सोडून देण्यात आले, पण मोबाईल जप्त करण्यात आले. एकूणच हा प्रकार मानवी हक्कांची पायमल्ली करणारा असून, विद्यार्थ्यांचे किंबहुना देशाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे हनन आहे.