सविता शिळीमकर मृत्यूच्या निषेधार्थ अंगणवाडी सभेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:45+5:302021-04-21T04:11:45+5:30

पुणे: कोरोनाकाळात सुरक्षा साधने नसल्याने अंगणवाडी सेविकेचे निधन झाल्याचा आरोप करत अंगणवाडी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात ...

Demonstrations of Anganwadi Sabha to protest the death of Savita Shilimkar | सविता शिळीमकर मृत्यूच्या निषेधार्थ अंगणवाडी सभेची निदर्शने

सविता शिळीमकर मृत्यूच्या निषेधार्थ अंगणवाडी सभेची निदर्शने

Next

पुणे: कोरोनाकाळात सुरक्षा साधने नसल्याने अंगणवाडी सेविकेचे निधन झाल्याचा आरोप करत अंगणवाडी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली.

सविता शिळीमकर या अंगणवाडी सेविकेचे कोरोनामुळे निधन झाले. प्रशासन या सेविकांना कोणतीही सुरक्षा साधने न देता त्यांना कोरोना रूग्ण सर्वेक्षण तसेच फिल्डवरच्या अन्य कामांना पिटाळत आहे. त्यांना साधे विमा सुरक्षा कवचही नाही, अशी टीका या वेळी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी केली.

अंगणवाडी सेविकांना मास्क, ग्लोज, सॅनिटायजर, फेसशिल्ड व पीपीई किट द्यावे, विमा काढावा, कोरोना झाल्यास उपचाराची व्यवस्था, खर्च सरकारने करावा, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांंना देण्यात आले.

ॲड. मोहन वाडेकर, सुनंदा साळवे, शैलजा चौधरी, अनिता आवळे, घोरपडे, ॲड. मोनाली अपर्णा, कल्याणी रवींद्र निदर्शनात सहभागी झाले होते.

Web Title: Demonstrations of Anganwadi Sabha to protest the death of Savita Shilimkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.