डेंगी : आठ दिवसांत ११ हजारांचा दंड!

By admin | Published: August 9, 2016 01:59 AM2016-08-09T01:59:57+5:302016-08-09T01:59:57+5:30

शहरातील डेंगीच्या डासांची आणि त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईत केवळ आठ दिवसांत ११,१०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Dengi: 11 days penalty in eight days! | डेंगी : आठ दिवसांत ११ हजारांचा दंड!

डेंगी : आठ दिवसांत ११ हजारांचा दंड!

Next

पुणे : शहरातील डेंगीच्या डासांची आणि त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईत केवळ आठ दिवसांत ११,१०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर सोमवारी एका दिवसात शहराच्या विविध भागांतून ३५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
डेंगीच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने हा दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहराच्या विविध भागांतील सोसायट्यांमध्ये स्वच्छता न ठेवल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
डेंगीच्या डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी राज्याच्या तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे वारंवार आवाहन करण्यात येते. तरीही अनेकदा त्याकडे नागरिक व सोसायट्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. मागील वर्षीपासून पालिकेच्या आरोग्य विभागाने या दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असल्याचे पालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले.
डेंगीच्या डासांची सर्वाधिक उत्पत्ती ही सोसायट्यांमध्ये होत असल्याचे आढळून आल्याने शहराच्या विविध भागांतून हा दंड वसूल करण्यात आल्याचे डॉ. बळीवंत यांनी सांगितले.
जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत पुणे महापालिकेने शहराच्या विविध भागांत केलेल्या कारवाईत ८२२०० रुपयांचा दंड सोसायट्या व नागरिकांकडून आकारण्यात आला आहे. याबरोबरच आॅगस्ट महिन्यात केवळ ८ दिवसांत
५० जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)


हलगर्जीपणा होत असल्याचे उघड
शासकीय आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व वैद्यकीय संस्था व रुग्णालयांमध्ये डेंगीच्या रुग्णांची नोंद घेतली जात होती. पण, खासगी रुग्णालयांवर याबाबत कोणतेही बंधन नव्हते. परंतु, आता महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य सेवा तसेच खासगी रुग्णालयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरही डेंगीग्रस्तांची नोंद घ्यावी लागणार आहे. त्यासंबंधीची माहिती व आकडेवारी शहरातील नगरपालिका, जिल्हा शल्यचिकित्सालय आणि महापालिकांच्या आरोग्य विभागाकडे तर ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे डेंगीच्या रुग्णांची नोंद करणे बंधनकारक होते. मात्र ग्रामीण व शहरातील बहुतेक खासगी रुग्णालयांकडून डेंगीग्रस्त रुग्णांच्या नोंदी करण्यात हलगर्जीपणा केला जात आहे.

Web Title: Dengi: 11 days penalty in eight days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.