डेंगी, चिकुनगुनियाचे वाढले रुग्ण
By admin | Published: October 28, 2016 04:33 AM2016-10-28T04:33:25+5:302016-10-28T04:33:25+5:30
बदलत्या हवामानामुळे शहरात साथीचे आजार वाढले असून, १० महिन्यांत डेंगी आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. डेंगीचे १८९, तर चिकुनगुनियाचे ३२ रुग्ण आढळून आले आहेत.
पिंपरी : बदलत्या हवामानामुळे शहरात साथीचे आजार वाढले असून, १० महिन्यांत डेंगी आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. डेंगीचे १८९, तर चिकुनगुनियाचे ३२ रुग्ण आढळून आले आहेत. साथीचे आजार रोखण्याबाबत आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
साथीचे आजार गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढत आहेत. डेंगी, स्वाइन फ्लू, मलेरिया, कावीळ, विषमज्वर यांसारखे साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून येतात. तसेच कावीळ, विषमज्वर हे आजार दूषित पाण्यामुळे होत असतात. साचलेल्या पाण्यात डासांची वाढ होऊन डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळते. एखाद्या साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतरच महापालिकेचा आरोग्य विभाग जागा होतो. मात्र, साथ पसरू नये, ती नियंत्रणात यावी, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत.
आॅक्टोबरमध्ये ५४ जणांना डेंगीची लागण झाली आहे, तर १६ जणांना चिकुनगुनियाची लागण झाली आहे. महिनाभरात आठ हजार ५२३ जण तापाने फणफणले आहेत.