डेंग्यू ने घेतला तरुणाचा बळी; आंबेगाव तालुक्यातील दुःखद घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 19:14 IST2023-09-01T19:13:58+5:302023-09-01T19:14:14+5:30
गावामध्ये फिरणारा आपला मित्र अचानक गेल्याने त्याचा सर्व मित्र परिवार हळहळ व्यक्त करतोय

डेंग्यू ने घेतला तरुणाचा बळी; आंबेगाव तालुक्यातील दुःखद घटना
जारकरवाडी: आंबेगाव तालुक्यातील अरविंद बाबुराव ढोबळे ( वय ३३ ) या तरुणाचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना घडली आहे. अचानक मृत्यू झालेल्या या तरुणाची बातमी गावात कळताच गावावर शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अरविंद ढोबळे याला तीन ते चार दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. आजारी पडल्याने त्याने प्रथम निरगुडसर, पारगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र त्याची तब्येतीत फरक पडला नाही, त्यानंतर त्याने मंचर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले त्यानंतरही त्याची तब्येत आणखीनच खालावली जास्त त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी अरविंद यास पुणे येथील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच जारकरवाडी गावात शोककळा पसरली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी मित्रांमध्ये, गावामध्ये फिरणारा आपला मित्र अचानक गेल्याने त्याचा सर्व मित्र परिवार हळहळ व्यक्त करत आहे. अरविंद ढोबळे यांच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे जारकरवाडी येथील कीर्तनकार ह.भ.प बाबुराव महाराज आबाजी ढोबळे यांचा तो मुलगा होता.