एसटी कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना डेंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:34 AM2017-08-08T02:34:38+5:302017-08-08T02:34:38+5:30

 Dengue to ST workers in the workshop | एसटी कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना डेंगी

एसटी कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना डेंगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामती एमआयडीसीतील एसटी विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना डेंगीसदृश आजाराची लागण झाली आहे. या कार्यशाळेच्या परिसरात गेल्या दोन वर्षांपासूनचे एसटीचे टायर साठविण्यात आले आहेत. जवळपास २५०० एवढी टायरची संख्या आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी उदासीनता दाखविल्याने कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांना डेंगीसदृश आजाराची लागण झाली आहे.
टायरची विल्हेवाट लावा, अशी सुचना आरोग्य विभागाने देऊन सुद्धा प्रशासनाणे दुर्लक्ष केले. त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांना सुद्धा या आजाराची लागण होत आहे. त्यामुळे कामगार व रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या २ वर्षापासून सदर टायर एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये डासांची उत्पत्ती झाली आहे. हे डास आजाराला कारणीभुत ठरले.
बापू लोखंडे, अमोल साठे, गजानन बेलदार व एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज जगताप यांना या आठवड्यात डेंग्युसदृश्य आजाराची लागण झाली आहे. जगताप यांच्यावर पुणे शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आणखी देखील इतर कामगारांना हा आजार झाला आहे. गेल्या दोन वर्षात देखील कामगारांना डेग्युसदृश्य आजाराची लागण झाली होती. त्यामुळे जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी कामगार करीत आहेत. टायरची साठवणूक केली. परंतु, डासांची निर्मिती होऊ नये म्हणून अधिकाºयांनी योग्य दक्षता घेजली नाही. त्यामुळे एसटी कर्मचºयांसह इतरांना डेंग्युसदृश्य आजाराची लागण झाली.
नाहक साठलेल्या टायरमुळे डेंग्युसदृश्य आजाराची लागण होत आहे. याबाबत संघटनेचे राज्य सरचिटणीस संदीप शिंदे यांनी सुद्धा कामगार अधिकारी यांना सांगितले. परंतु, कारवाई चालू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळ विले आहे. या पलीकडे काहीही अधिकारी करीत नाही, असा आरोप विभागीय कार्यशाळा कामगार संघटना सचिव राजेंद्र भोसले यांनी केला आहे. तर कामगारचा औषधोपचार साठी झालेला खर्च व रजा खर्च स्थानिक अधिकाराच्या पगारातून दिला जावा, अशी मागणी कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज जगताप यांनी केली आहे. जगताप हेच सध्या पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दुर्लक्षामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ

बारामती शहराच्या नव्या, जुन्या हद्दीत डेंगी, गोचीड ताप, चिकुनगुनियासह मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच एमआयडीसीतील एसटीच्या विभागीय कार्यशाळेच्या आवारात निकामी पडलेल्या टायरमध्ये पाणी साठून डासांना अंडी घालण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. अनेकदा आरोग्य विभागाकडून याबाबत जागृती केली जात आहे. परंतु, नागरिकांच्या दुर्लक्षामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

अपेक्षित किंमत न आल्याने टायरचा लिलाव होऊ शकला नाही. मात्र, साठलेल्या टायरमध्ये पाणी साठू नये, हे पाणी वेळेवर काढून टाकणे, औषध फवारणी करण्यासाठी दक्षता घेण्याबाबत संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात येतील.
- श्रीनिवास जोशी,
पुणे जिल्हा विभागीय नियंत्रक

सध्याच्या एसटीच्या मागणीनुसार दोन वेळा फवारणी केली आहे. स्वच्छता ठेवण्यासाठी सूचना केल्या आहेत.
- सुभाष नारखेडे,
आरोग्य अधिकारी, बारामती नगरपालिका

Web Title:  Dengue to ST workers in the workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.