उन्हाळी पेरणीसाठी सोयाबीनवर बीजप्रक्रियेबाबत कृषी विभागाचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:40+5:302021-02-10T04:10:40+5:30
बाजारभाव जास्त मिळण्याचे संकेत असून शेतकऱ्यांना चांगल्या आर्थिक फायदा होईल म्हणून शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पीक घ्यावे असे ही ...
बाजारभाव जास्त मिळण्याचे संकेत असून शेतकऱ्यांना चांगल्या आर्थिक फायदा होईल म्हणून शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पीक घ्यावे असे ही त्यांनी सांगितले.
कृषी पर्यवेक्षक जी. आर. ठाकूर यांनी शेतकऱ्यांना विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत विविध गटांनी तसेच महिला बचतगटांनी सहभागी व्हावे व आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकावा व यासाठी कृषी विभागाच्या विविध सहायक योजनाबाबत माहिती दिली व मार्गदर्शन केले.
कृषी सहायक श्रीमती. व्ही. एल. खडतरे यांनी कृषी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या फळबाग लागवड योजना तसेच ठिबक व तुषार सिंचन योजनेबाबत माहिती दिली. तसेच नंतर विकास बुट्टे पाटील यांच्या शेतावर जाऊन उन्हाळी सोयाबीनसाठी बीजप्रक्रिया करून उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली.
कृषी विभागामार्फत खेड तालुक्यातील बागायत भागातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करणेत येते आहे कि त्यांनी आपल्या शेतात किमान ०.२० हेक्टर क्षेत्रावर तरी उन्हाळी सोयाबीन पीक घ्यावे ते त्यांना फायद्याचे राहील. तसेच उन्हाळी सोयाबीन करताना टोकन पद्धतीचा अवलंब केल्यास बियाणे कमी लागेल बी टाकताना ते उथळ टाकावे तीन ते चार सेमीपेक्षा जास्त खोल बियाणे टाकू नये. तसेच बियाण्यास थायरमची बीजप्रक्रिया करावी त्यामुळे पिकाचा मर रोगापासून बचाव होतो. सूक्ष्मजीवाणू रायझोबियम व स्फूरद विरघळवणारे जीवाणू संवर्धक याची ही बीजप्रक्रिया प्रति दहा ते पंधरा किलो ग्रॅम बियाण्यास २५० ग्राम या प्रमाणात करावी. टोकनसाठी हेक्टरी ४० ते ५० किलो बियाणे पुरेसे आहे.
--
फोटो क्रमांक :
फोटो... उन्हाळी पेरणीसाठी सोयाबीनवर बीजप्रक्रिया करताना विकास बुट्टे पाटील.