Pune: शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची नियमावली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 11:12 AM2021-11-29T11:12:46+5:302021-11-29T11:15:16+5:30

कन्टेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करू नयेत.तसेच कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत येण्यास अनुमती देऊ नये. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळेची स्वच्छता करून घ्यावी...

Department of Health regulations for starting schools | Pune: शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची नियमावली जाहीर

Pune: शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची नियमावली जाहीर

Next

पुणे : राज्यातील शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असली तरी शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यावर कोणती काळजी घ्यावी याबाबतची सविस्तर नियमावली आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. त्यानुसार कोरोना विषयक नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी शाळा, विद्यार्थी, शिक्षकसर्वांनीच घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत.

कन्टेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करू नयेत.तसेच कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत येण्यास अनुमती देऊ नये. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळेची स्वच्छता करून घ्यावी. शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती पध्दत टाळावी. शिक्षक व विद्यार्थी संख्या विचारात घेऊन शाळेत मुबलक ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करावी. शक्यतो शाळेत गर्दी होणारे खेळ सामूहिक प्रार्थना असे उपक्रम टाळावेत. शाळेतील जलतरण तलाव सुरू करू नयेत. सर्वांनी फेसमास्क, फेस कव्हर, हॅन्ड सॅनिटायझर यांचा पुरेसा साठा ठेवावा.

कोरोना विषयक लक्षणे असणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास परवानगी देऊ नये.शाळेत दर्शनी भागात कोरोना प्रतिबंधक संदर्भातील आरोग्य शिक्षण विषयक साहित्य लावावे.स्कूल बस मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहनात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आजारी विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेत येऊ नये. विद्यार्थी व शिक्षकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे शाळेत कोणालाही कोरोना विषयक लक्षणे अढळल्यास कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबतची सविस्तर नियमावली आरोग्य विभागाने प्रसिध्द केली आहे.

Web Title: Department of Health regulations for starting schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.