रेडा समाधीस्थळ पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:32+5:302021-07-04T04:07:32+5:30
कोरोना संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभूमीवर यावर्षीही आषाढी पायी वारी सोहळा रद्द झाला. आळे येथील श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान संस्थानचा गेली ...
कोरोना संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभूमीवर यावर्षीही आषाढी पायी वारी सोहळा रद्द झाला. आळे येथील श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान संस्थानचा गेली पंधरा वर्षांपासून आषाढी वारीसाठी पायी पालखी दिंडी सोहळा जातो. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पालखी प्रस्थान सोहळा झाला. मंदिरात वीणापूजन देवस्थान अध्यक्ष चारूदत्त साबळे यांचे हस्ते झाले. यावेळी विणेकरी रामदास सहाणे उपाध्यक्ष अविनाश कु-हाडे सचिव संतोष पाडेकर खजिनदार संजय खंडागळे माजी अध्यक्ष गिरीश कोकणे, धनंजय काळे, म्हतुजी सहाणे, संजय कु-हाडे, अरूण गुंजाळ, बाळासाहेब शेळके, गोरक्ष गुंजाळ, बाजीराव निमसे, बाळशिराम डावखर, गोरक्ष दिघे, माधव टकले, सचिव कान्हू पाटील कु-हाडे व भाविक उपस्थित होते. प्रस्थान सोहळा झाल्यानंतर पालखी व पादुका भक्तभवन येथे ठेवल्या. येथे महिनाभर भजन, हरिपाठ व जागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
हरिनामाच्या जयघोषात श्री क्षेत्र आळे येथील पालखी सोहळ्याचे झालेले प्रस्थान.