चांगा वटेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान मंगळवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:20+5:302021-07-05T04:08:20+5:30
यवत येथील हभप बबन सोनबा दोरगे यांच्या मानाच्या बैलाची जोडी श्री संत चांगा वटेश्वर महाराज पालखी रथाला जोडली जाते.चांगा ...
यवत येथील हभप बबन सोनबा दोरगे यांच्या मानाच्या बैलाची जोडी श्री संत चांगा वटेश्वर महाराज पालखी रथाला जोडली जाते.चांगा वटेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान मंगळवारी (दि. ६) होणार आहे.
यंदा कोरोनाच्या महामारीमुळे पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला असला तरी शासनाच्या नियमाप्रमाणे एसटी बसमधून आषाढी वारी वाखारीपर्यंत जाऊन नंतर तिथून पायी पंढरपूरला नेली जाणार आहे. श्रीसंत चांगा वटेश्वर महाराज पालखी सोहळा मानाच्या १० पालखी सोहळ्यांपैकी एक असून संतश्रेष्ठ सोपानदेव महाराज व चांगदेव महाराज यांनी एकत्रित समाधी घेतली होती. यामुळे चांगा वटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे महत्त्वदेखील मोठे असल्याचे चोपदार शशिकांत जगताप यांनी या वेळी सांगितले.
मानाच्या बैल जोडी पूजन करण्यासाठी पालखी सोहळाप्रमुख ह.भ.प. जनार्धन महाराज वाबळे, विश्वस्त ह.भ.प.अरुण दरेकर, ह.भ.प.किरण गायकवाड, बाळासो कामथे, दिंडीप्रमुख कांतानाना खेडेकर, निवृत्ती कुंजीर, ह.भ.प. दशरथ इंदलकर, कैलास दोरगे, लक्ष्मण दोरगे, विक्रम दोरगे, सोन्या दोरगे , विजय दोरगे , रामभाऊ दोरगे , चांद मुलानी आदी उपस्थित होते.
संत चांगा वटेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या रथाला जोडण्यात येणारी मानाची बैलजोडी राजा व प्रधान यांचे यवत येथे देवस्थानच्या वतीने पूजन करण्यात आले.