मल्लिकार्जुन कावड सोहळ्याचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:19+5:302021-03-13T04:17:19+5:30
गुरुवारी (दि ११) सकाळी ९ वाजता मल्लिकार्जुन कावड सोहळ्याचे प्रस्थान झाले. या वेळी कावड सोहळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली ...
गुरुवारी (दि ११) सकाळी ९ वाजता मल्लिकार्जुन कावड सोहळ्याचे प्रस्थान झाले. या वेळी कावड सोहळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. बाजारपेठेतील व्यापारी बांधवांनी भक्तिभावाने कावड सोहळ्याचे स्वागत करून भाविकांना फराळाचे वाटप केले. या वेळी अनेक भाविकांनी ‘श्रीं’ ना नारळाची तोरणे अर्पण केली. महिलांंनी ‘श्रीं’च्या मूर्तीचे पूजन केले तर शेतकरी व व्यापारी बांधवांंची कावडीला खांदा देण्यासाठी झुंबड उडाली होती. घोडगंगा करखाना, आलेगाव पागा, राक्षेवाडी, रांजणगाव सांडस मार्गे दुपारी बाराच्या सुमारास कावड सोहळा रांजणगाव-वाळकी संगम बेटावर पोहोचला. त्यानंतर ‘श्रीं’ना अभ्यंग स्नान घालण्यात आले. येथील शिवालयात जलाभिषेक करून व संतराज महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन कावड सोहळा परतीच्या मार्गावर मार्गस्थ झाला. दुपारी चारच्या सुमारास कावड सोहळा न्हावरे येथे पोहोचल्यानंतर भाविकांनी मिरवणूक काढून कावड सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी तरुणांनी कावड उचलण्याचा आनंद लुटला. सायंकाळी पाच वाजता कावड सोहळा रानातल्या महादेव मंदिरात विसावला
बातमीला फोटो आहे.
फोटो: न्हावरे (ता. शिरुर) येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री. मल्लिकार्जुन महाराज कावड सोहळ्याच्या प्रस्थानप्रसंगी काढण्यात आलेली मिरवणूक.