अलंकापुरीतून माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:38+5:302021-07-03T04:08:38+5:30

भानुदास पऱ्हाड लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी : अवघाचा संसार सुखाचा करीन ! आनंदे भरीन तिन्ही लोक !! ...

Departure of Mauli's variable padukas from Alankapuri | अलंकापुरीतून माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान

अलंकापुरीतून माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान

Next

भानुदास पऱ्हाड

लोकमत न्यूज नेटवर्क

आळंदी : अवघाचा संसार सुखाचा करीन !

आनंदे भरीन तिन्ही लोक !! जाईन गे माये तया पंढरपुरा !

भेटेन माहेर आपुलिया !!

श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९० व्या आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भक्तीच्या या छोट्याखानी सोहळ्यात ना टाळाचा प्रचंड गजर झाला... ना पखवादाची थाप घुमघुमली... ना फेर - फुगड्या... ना देहभान विसरून नाचणारे वारकरी... ना मोठा हरिनामाचा गजर... ना भव्य - दिव्य स्वरूप. शासनाच्या नियमांचे पालन करत अगदी साध्या पद्धतीने संबंधित निमंत्रित वारकऱ्यांच्या समवेत सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास माउलींच्या चांदीच्या चलपादुकांनी मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवले.

प्रस्थान सोहळ्यास शुक्रवारी (दि.०२) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर माउलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा संपन्न करण्यात आली. विणामंडपात सकाळी दहानंतर भगवान महाराज कबीर यांचे काल्याचे कीर्तन झाले. बाराच्या दुपारी १२ ते १२.३० दरम्यान माऊलींना नैवद्य दाखविण्यात आला. त्यानंतर चारला प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात झाली.

ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. दरम्यान, शासनाने परवानगी दिलेल्या प्रस्थान संबंधित मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी आदींना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर माऊलींचे दोन्ही अश्व सन्मानपूर्वक महाद्वारातून मंदिरात आणण्यात आले. माउलींची व गुरू हैबतबाबांची आरती घेऊन देवस्थानच्या विश्वस्तांकडून माउलींच्या चांदीच्या चलपादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक राजेंद्र पवार - आरफळकर यांच्या हातात सुपूर्द करून चलपादुकांचे मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले.

वीणा मंडपातून चलपादुका बाहेर आणल्यानंतर मंदिर आवारात उपस्थित वारकऱ्यांच्या ‘ज्ञानोबा - माऊली - तुकारामांच्या’ जयघोषात मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने परंपरेप्रमाणे पादुका लगतच्याच आजोळघरात (दर्शनमंडप) विराजमान करण्यात आल्या. त्याठिकाणी समाजआरती घेऊन पहिल्या दिवसाचा जागर करण्यात आला.

चौकट :

माउलींच्या १९० व्या आषाढी वारी प्रस्थान प्रसंगी पवमान अभिषेक, ब्रम्हवृन्दांचा वेदघोष, समाधीवर माऊलींच्या मुखवट्याला दूध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने 'श्रीं'ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधिवत पूजासमयी माऊलींचे 'साजिरे' रूप आकर्षक दिसून येत होते.

फोटो ओळ : माऊली निघाली... श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीचे शुक्रवारी (दि.२) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास तीर्थक्षेत्र आळंदीतून प्रस्थान झाले. (छायचित्र : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Departure of Mauli's variable padukas from Alankapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.