रायरेश्वर दिंडीचे प्रस्थान : भक्तिरसात न्हाले भोर शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:37 AM2018-07-10T01:37:51+5:302018-07-10T01:38:03+5:30
सुमारे १९८० मध्ये ३९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायरेश्वर दिंडीचे सोमवारी भोरवरून पंढरपूरला मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. या वेळी टाळ, मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.
भोर - सुमारे १९८० मध्ये ३९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायरेश्वर दिंडीचे सोमवारी भोरवरून पंढरपूरला मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. या वेळी टाळ, मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.
महाडनाका येथील हनुमंत शिरवले यांच्या घराजवळून सकाळी रायरेश्वर दिंडीच्यावतीने तयार केलेल्या माऊलींच्या रथाचे पूजन दिलीप बाठे यांच्या हस्ते करून दिंडीला सुरुवात झाली. यावेळी दिंडीचे संस्थापक माजी आमदार संपतराव जेधे, दिंडीचालक नामदेवमहाराज किंद्रे, दिलीप बाठे, हनुमंत शिरवले, दिलीप देशपांडे, अनिता बाठे, पांडुरंग गोरे, प्रवीण शिंदे, पांडुरंग कुमकर, सुरेश शिंदे, डॉ. प्रदीप पाटील, बापू शिरवले, रवींद्र बांदल, नितीन जेधे, बाळू सोनवणे, बापू कंक, लक्ष्मण पारठे, अभिमन्यू चिकणे, राहुल पारठे, मालबा चव्हाण व वारकरी, नागरिक उपस्थित होते.
हातात भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जप करीत वारीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भोरच्या सीमेपर्यंत ढोल-लेझमीच्या पथकाने निरोप दिला. वाटेत श्रीपतीनगर, चौपाटी, रामबागसह अनेकठिकाणी वारीचे भक्तांनी स्वागत केले. यावेळी निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी दिंडीचे स्वागत केले. चौपाटीला सुनील गोळे, संजय गोळे यांच्या कुटुंबीयांनी चहा-नाष्ट्याची सोय केली होती.
१९८० मध्ये पाच वारकऱ्यांवर माजी आमदार संपतराव जेधे यांनी रायरेश्वर दिंडी सुरू केली होती. आज ३९ वर्षे अखंडपणे वारी सुरू असून वारीचा आता वटवृक्ष झाला आहे. सुमारे ८०० ते एक हजार वारकरी रायरेश्वर दिंडीच्या माध्यमातून वारीला जातात.
पंढरपूर येथील धर्मशाळेत रायरेश्वर दिंडीतील वारकºयांची राहण्याची व दर्शनाची व्यवस्था दिंडीच्या माध्यमातून केली जाते. याशिवाय गावागावात शिबिरे, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे दिंडीचालक हभप नामदेवमहाराज किंद्रे यांनी सांगितले.
अनेक वर्षांची परंपरा आजही कायम
सुरुवातीला रायरेश्वर किल्ला ते पंढरपूर अशी वारी सुरू झाली. त्यानंतर रायरेश्वर ते आळंदी आषाढीवारी, रायरेश्वर ते शिवथरघळ अशा वाºया सुरू केल्या असून त्या अखंडपणे सुरू आहेत. या वारीत भोर, महाड, वाई तालुक्यातील भाविक उत्साहाने सहभागी होतात.
वारीला येणाºया भाविकांची राहण्याची, चहा, नाष्टा, जेवणाची सोय रायरेश्वर धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून केली जाते. वारीचा पंढरपूरपर्यंत १३ ठिकाणी मुक्कामासह १७ दिवसांनी वारी संपते.
ऊन, पावसाचा विचार न करता मुला-बाळांपासून घरापासून दूर राहून परमेश्वराच्या (विठ्ठलाच्या) दर्शनासाठी हे वारकरी वारीला जातात. यात महिलांसह तरुणांचाही मोठा सहभाग असतो.