पालखी सोहळ्यासाठी शिवछत्रपतींच्या पादुकांचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:35+5:302021-06-25T04:08:35+5:30
आषाढीवारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्तिपरंपरेतील शिवरायांच्या पादुका दर वर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास ...
आषाढीवारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्तिपरंपरेतील शिवरायांच्या पादुका दर वर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. त्यानंतर श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतात. शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे ७ वे वर्ष आहे.
कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ शिवभक्त या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. शिवाईदेवीच्या चरणांशी असलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी योगऋषी सुधीर इंगवले, ॲड. भाऊसाहेब शिंदे, ॲड. राहुल कदम, ह.भ.प. साहीलबुवा शेख व पलाश देवकर यांना मिळाली आहे.
शिवजन्मभूमीत संदीपशेठ ताजणे, नेत्राली ताजणे, संतोष परदेशी, कल्पेश परदेशी, केदार पुरवंत, हर्षवर्धन कुऱ्हे, सुशांत शिंदे, सूरज खत्री यांनी सोहळ्याचे नियोजन केले.
फोटोओळ -किल्ले शिवनेरीवरून शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्यासाठी शिवाजी महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान झाले.
चौकट
श्रीशिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर, शिवाई देवीची महापूजा बांधून, महाद्वार पूजन झाल्यानंतर सोहळा रायगडच्या दिशेने प्रतीकात्मक एक हजार पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला. शिवनेरीहून निघालेल्या पादुका मंचर, खेड, पुणेमार्गे श्रीशंभूराजांच्या जन्मभूमी असलेल्या गड पुरंदरी विसावा घेऊन पुढे रायगडला पोहोचतील.