पुरंदर तालुक्यातील दोन जणांवर हद्दपारीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:32+5:302021-03-13T04:21:32+5:30
जीवन बाजीराव खेडेकर (वय २५, रा. गुरोळी, ता. पुरंदर), अनुज रोहिदास भांडवलकर. (वय- २०, रा. गुरोळी, ता. ...
जीवन बाजीराव खेडेकर (वय २५, रा. गुरोळी, ता. पुरंदर), अनुज रोहिदास भांडवलकर. (वय- २०, रा. गुरोळी, ता. पुरंदर) असे दोघेजण एकत्रित रित्या आर्थिक प्राप्तीकरिता मोटरसायकलच्या चोऱ्या करीत असल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्याविरुद्ध सासवड पोलिस स्टेशन कडून हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. इसम नामे जीवन बाजीराव खेडेकर तसेच त्याचा सहकारी अनुज रोहिदास भांडवलकर यांची सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत असल्याचे तसेच त्यांचे पासून सर्वसामान्य लोकांची आर्थिक हानी व त्रास होत असल्याने त्यांना सहा महिन्या करिता पुरंदर, बारामती, हवेली, दौंड व भोर तालुक्यातून हद्दपार करणे बाबतचा आदेश पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी पारित केला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट, रामेश्वर धोंडगे, दत्तात्रय जगताप, राजू पुणेकर, पोलीस नाईक सागर चंद्रशेखर, यांनी ही कारवाई केली.