अवसायनात गेलेल्या संस्थांनी ठेवीदारांच्या ठेवी द्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:58+5:302021-04-04T04:11:58+5:30
जुन्नर : गेल्या दहा वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या, तसेच कामकाज बंद असलेल्या व अवसायनात गेलेल्या जुन्नर ...
जुन्नर : गेल्या दहा वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या, तसेच कामकाज बंद असलेल्या व अवसायनात गेलेल्या जुन्नर मधील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी त्यांच्या ठेवी परत न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा ठेवीदार समितीचे समनवयक प्रदीप कर्पे यांनी केले आहे.
विसर्जित करण्यात येत असलेल्या असलेल्या जुन्नरमधील शिवनेर नागरी सहकारी संस्थेच्या संदर्भात ठेवीदार, कर्जदार, इतर हितसंबधी यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केल्यानंतर जवळपास आठशे ठेवीदारांनी जवळपास पाच कोटी रकमेचा दावा केला आहे. जवळपास ३००० ठेवीदारांच्या ठेवी या पतसंंस्थेकडे असल्याचे सांगण्यात येते. तरी या ठेवीदारांनी संस्थेकडे त्यांच्या ठेवी संदर्भात दावा करण्याचे आवाहन शिवनेर पतसंस्था ठेवीदार समितीचे समनवयक प्रदीप कर्पे यांनी केले आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण याचेकडील आदेशाप्रमाणे सदर संस्था अंतीमरीत्या विसर्जनात घेण्यात आली आहे. सध्या संस्थेचे विसर्जनाचे काम सुरू आहे. संस्थेचे सभासद, कर्जदार, ठेवीदार, इतरही संबधी यांचे संस्थेकडे आर्थिक येणे-देणे असल्यास तसेच संस्थेच्या विरोधाचे काही दावे असल्यास त्याची माहीती अशा योग्य त्या कागदपत्रासह व पुराव्यासह लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन पतसंस्थेचे विसर्जन आधिकारी बी. एम. बांगर यांनी दोन महिन्यांपूर्वी केले होते. संबंधितांनी विहीत मुदतीत अशा प्रकारचे म्हणणे सादर न झाल्यास शिवनेर संस्थेविरुद्ध कोनतेही दावे अथवा म्हणणे नाही असे गृहीत धरून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.