नाना पेठेतील डिप्रेस्ड क्लासेस मिशनला ९० वर्षे कराराने जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:28+5:302021-09-02T04:20:28+5:30

पुणे : नाना पेठ येथे दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

Depressed Classes Mission in Nana Peth under contract for 90 years | नाना पेठेतील डिप्रेस्ड क्लासेस मिशनला ९० वर्षे कराराने जागा

नाना पेठेतील डिप्रेस्ड क्लासेस मिशनला ९० वर्षे कराराने जागा

Next

पुणे : नाना पेठ येथे दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, महात्मा जोतिराव फुले मुलींचे हायस्कूल, महात्मा जोतिराव फुले मुलांचे हायस्कूलच्या जागेचा करार पुढील ९० वर्षे वाढवून देण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली़

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला असलेल्या सदर संस्थेला ९० वर्षांपूर्वी नाममात्र भाडेकराराने नाना पेठेतील जागा देण्यात आली होती़ फेब्रुवारी महिन्यात हा करार संपल्याने त्यास मुदतवाढ मिळावी म्हणून, राष्ट्रवादी कॉंग्रेसने यापूर्वीच तसा प्रस्ताव दिला होता़ तर आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत उपमहापौर सुनीता वाडेकर आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीदेखील या संस्थेला पूर्वीच्याच भाडेदराने जागा देण्यात यावी याबाबतचा प्रस्ताव दिला़ त्यास महापालिका स्तरावर ३० वर्षे मुदतवाढ देऊन ९० वर्षांच्या मुदतीसाठी तो प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यास यावेळी एकमताने मंजुरी देण्यात आली़

----------------

जम्बो हॉस्पिटलला मुदतवाढ

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलला तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णयही आजच्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला़ कोरोना आपत्तीत सर्वसामान्यांना कोरोनामुक्त करणाºया या जम्बो हॉस्पिटलमध्ये ६०० आॅक्सिजन बेड, १०० आयसीयू बेड व २०० एचडीयू बेड आहेत. या हॉस्पिटलला यापूर्वी ३० जून २०२१ तर नंतर ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती़

--------------

दाखल मान्य विषयांची चलती

आजच्या बैठकीत कोट्यवधी रुपयांच्या दाखल मान्य विषायांचीच चलती होती़ यामध्ये शेकडो कोटींच्या निविदांसह, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणाºया स्वच्छ सर्वेक्षण आणि प्रकल्प व्यवस्थापनाकरीता सल्लागार नियुक्तीचा १ कोटी ८२ लाख रुपयांचा विषय, प्रयेजा सिटी ते वारजे येथे महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्यासाठी १ कोटी ६२ लाखांचा विषय मंजूर करण्यात आला़

----------------------------

Web Title: Depressed Classes Mission in Nana Peth under contract for 90 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.