नैराश्येतून इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या;कोंढव्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 09:36 PM2021-03-30T21:36:25+5:302021-03-30T21:36:43+5:30

लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी आणि पबजी खेळण्याच्या नैराश्यातून संपवले जीवन

Depressed engineer commits suicide by strangulation; Kondhwa incident | नैराश्येतून इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या;कोंढव्यातील घटना

नैराश्येतून इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या;कोंढव्यातील घटना

Next

पुणे : लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी अन पबजी गेम खेळण्याचा लागलेला नाद यातून आलेल्या नैराश्यातून एका इंजिनिअर असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ऋषिकेश मारुती उमाप (वय २९, रा. कावेरी पार्क सोसायटी, कोंढवा खुर्द) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

उमाप हा कावेरी पार्क सोसायटीत आई वडिलासमवेत रहात होता. सोमवारी रात्री तो नेहमीप्रमाणे झोपला होता. सकाळी तो दरवाजा उघडत नसल्याचे समजल्यावर दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर ऋषिकेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती कोंढवापोलिसांना देण्यात आली.

उमाप हा इंजिनिअर असून लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडल्याने त्याची नोकरी गेली होती. तेव्हापासून तो घरीच होता. तसेच, रात्र रात्र तो पबजी गेम खेळत होता. रात्री तो त्याच्या खोलीत झोपायला गेला. सकाळी उशीरापर्यंत तो न उठल्याने घरच्यांनी दरवाजा वाजविला, पण आतून आवाज येत नसल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. कोंढवा पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

Web Title: Depressed engineer commits suicide by strangulation; Kondhwa incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.