सखोल अभ्यास, वेळेचे नियोजनाने यश : चाटे

By admin | Published: November 26, 2014 12:10 AM2014-11-26T00:10:23+5:302014-11-26T00:10:23+5:30

विद्याथ्र्यानी दहावी बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना, विषयांचा सखोल अभ्यास, परीक्षांचा सराव, वेळेचे नियोजन, आरोग्य आदी बाबींवर विशेष लक्ष दिले पाहिजे

In-depth study, success of time planning: LATS | सखोल अभ्यास, वेळेचे नियोजनाने यश : चाटे

सखोल अभ्यास, वेळेचे नियोजनाने यश : चाटे

Next
पुणो : विद्याथ्र्यानी दहावी बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना, विषयांचा सखोल अभ्यास, परीक्षांचा सराव, वेळेचे नियोजन, आरोग्य आदी बाबींवर विशेष लक्ष दिले पाहिजे तरच योग्य वाटचाल होऊ शकते, असे मत चाटे समूहाचे संचालक फुलचंद चाटे यांनी व्यक्त केले. 
चाटे शिक्षण समूहातर्फे दहावीमध्ये असणा:या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी दहावीनंतरच्या स्पर्धा व संधी या विषयावर मार्गदर्शन सोहळा घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रा. गोपीचंद चाटे, प्रा. शिंदे, प्रा. काटकर, प्रा. समर जमादार आदी उपस्थित होते. 
फुलचंद चाटे म्हणाले, की उच्च शिक्षणाकरिता चांगल्या संधी मिळवायच्या असतील तर काळाची गरज ओळखून विद्याथ्र्यानी वाटचाल करावी. अकरावी आणि बारावीचे योग्य नियोजन करणो आवश्यक आहे. याच दोन वर्षात विद्यार्थी दुर्लक्ष करतात. त्यांना वेळीच जाणीव करून देणो आवश्यक असते. त्यांना पालकांची साथही महत्त्वाची असते. दहावीनंतर विद्याथ्र्यानी लगेच अकरावीच्या पहिल्या दिवसापासूनच ज्या प्रवेश परीक्षा देशपातळीवर आहेत, मग ते मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंगची परीक्षा असेल, त्याची तयारी केली पाहिजे. तरच आपण देशातील विद्याथ्र्याच्या स्पर्धेत टिकू शकतो. 
 

 

Web Title: In-depth study, success of time planning: LATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.