उपमुख्यमंत्र्यांचा लंडनच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:13 AM2021-09-10T04:13:50+5:302021-09-10T04:13:50+5:30

बारामती: . कोरोनाकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाची दखल घेत लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने सर्टिफिकेट ऑफ ...

Deputy Chief Minister of London | उपमुख्यमंत्र्यांचा लंडनच्या

उपमुख्यमंत्र्यांचा लंडनच्या

Next

बारामती: . कोरोनाकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाची दखल घेत लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वित्झर्लंड) देऊन त्यांना गौरविण्यात आले.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे युरोपचे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात ७० देशांमध्ये कोरोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे. कोरोनामुक्तीसाठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी या संस्थेमार्फत व्यक्ती व संस्थाना सन्मानित करण्यात येत आहेे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना मंत्रालयातील उपमुख्यमंत्री दालनात या पुरस्काराने सन्मानित केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले धडाडीचे व झटपट निर्णय, वैद्यकीय सुविधा प्राप्त करून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन पुरस्कार दिला गेला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुरस्कार देताना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके.

०९०९२०२१-बारामती-०२

Web Title: Deputy Chief Minister of London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.