पुणे महापालिकेच्या उपायुक्ताकडे सापडले एक कोटींचे घबाड; ACB ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 07:18 PM2022-07-05T19:18:12+5:302022-07-05T19:19:40+5:30

उत्पन्नापेक्षा ३१ टक्के अधिक मालमत्ता, कोण आहेत विजय लांडगे?...

Deputy Commissioner of Pune Municipal Corporation found a scam of Rs 1 crore; | पुणे महापालिकेच्या उपायुक्ताकडे सापडले एक कोटींचे घबाड; ACB ची कारवाई

पुणे महापालिकेच्या उपायुक्ताकडे सापडले एक कोटींचे घबाड; ACB ची कारवाई

googlenewsNext

पुणे :पुणे महापालिकेचे उपायुक्त विजय लांडगे यांच्याकडे उत्पन्नापेक्षा १ कोटी रुपयांची अधिक मालमत्ता आढळून आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महापालिका उपायुक्त विजय भास्कर लांडगे (वय ४९, रा. ठाणगाव ता. सिन्नर, जि. नाशिक) आणि त्यांची पत्नी शुभेच्छा विजय लांडगे (वय ४३) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. विजय लांडगे हे सध्या ते महापालिकेच्या तांत्रिक विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

विजय लांडगे याच्याविषयी गोपनीय चौकशी झाल्यानंतर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी उघड चौकशीची परवानगी देण्यात आली होती. विजय लांडगे हे २४ फेब्रुवारी २००० रोजी पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदावर रुजू झाले होते. तेव्हापासून १९ फेब्रुवारी २०२१ या कालावधीतील त्यांच्या एकूण उत्पन्नाची मोजदाद करण्यात आली. त्यात त्यांचे एकूण उत्पन्न ३ कोटी २४ लाख ७९ हजार ४१२ रुपये इतके होते. त्या कालावधीत त्यांची एकूण मालमत्ता ४ कोटी २७ लाख ४० हजार ४०५ रुपये इतकी आढळून आली. हे पहाता १ कोटी २ लाख ६० हजार ९९३ रुपये (एकूण मालमत्तेच्या ३१.५९ टक्के) अधिक मालमत्ता आढळून आली आहे.

विजय लांडगे व त्यांच्या कुटुंबियांचे नावे पुणे शहरात ४ ठिकाणी व नाशिक जिल्ह्यामध्ये १ अशा ५ ठिकाणी मालमत्ता मिळून आल्या असून त्यांचे राहते घराची व या ठिकाणांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती सुरु आहे.

कनिष्ठ अभियंता ते उपायुक्त
विजय लांडगे हे २००० मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. पहिली नेमणूक पथ विभागात झाली. २००३ मध्ये पथ विभागातन पाणी पुरवठा विभागात झाली. त्यानंतर त्याच वर्षी टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय, त्यानतर २००४ मध्ये पुन्हा पथ विभागात बदली झाली. यानंतर २००७ मध्ये वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, २००९ मध्ये घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, २४ मे २०१० रोजी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात बढती, २०१३ मध्ये सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात बदली. २०१६ मध्ये येरवडा कार्यालयात बदली, मार्च २०२१ मध्ये उपायुक्त म्हणून बढती होऊन आकाश चिन्ह परवाना विभागात कार्यरत आहेत.

Web Title: Deputy Commissioner of Pune Municipal Corporation found a scam of Rs 1 crore;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.