आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त अण्णाभाऊंच्या साहित्यिकाकडे दुर्लक्ष : लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 03:26 PM2018-08-01T15:26:27+5:302018-08-01T15:30:32+5:30

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या तडाखेबंद लेखणीने मातंग, शोषित आणि वंचित समाजाच्या व्यथा-वेदना साहित्यातून मांडल्या....  

Describing the internationally reputed Annabhau literature: Lakshmikant Deshmukh | आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त अण्णाभाऊंच्या साहित्यिकाकडे दुर्लक्ष : लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत

आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त अण्णाभाऊंच्या साहित्यिकाकडे दुर्लक्ष : लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत

Next
ठळक मुद्देसारसबाग येथील पादचारी पुलावरुन गुलाबपुष्पवृष्टी करुन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य क्रांतीदिंडीस प्रारंभ

पुणे:- अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची नाळ तळागाळातील माणसाच्या दु:खाशी जोडलेली होती. त्यांचे दु:ख, कष्ट, वेदना या सगळ्याबद्दल त्यांनी तळमळीने लेखन केले. लालबावटा पथकाद्वारे समाजाच्या प्रबोधनाचा विडा उचलला. तर शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीची बीजे रोवली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, साहित्याला परिवर्तनवादी वळण देणा-या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या साहित्यिकाकडे दुर्लक्ष झाले असल्याची खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.
पुणे शहर जिल्हा मातंग समाजातर्फे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 98 व्या जयंती महोत्सवानिमित्त त्यांच्या साहित्याचा अंतर्भाव असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य क्रांतीदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते. यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट, सचिव सचिन जोगदंड, प्रकाश वैराळ, अशोक कोवळे, सुरेखा भालेराव, लता राजगुरू, विठ्ठल गायकवाड, परशुराम वाडेकर, संपत जाधव, केदार वैराट यांच्यासह अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे प्रचारक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.  
सारसबाग येथील पादचारी पुलावरुन गुलाबपुष्पवृष्टी करुन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य क्रांतीदिंडीस प्रारंभ झाला. सारसबाग येथील अण्णाभाऊ साठ्ये पुतळ्यापासून सारसबाग चौकातील महालक्ष्मी मंदिरामार्गे वळण घेऊन परत अण्णाभाऊ साठे  यांच्या पुतळ्याजवळ या साहित्य क्रांतीदिंडीचा समारोप करण्यात आला. 
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, लेखक आणि कलाकारांनी वंचितांच्या उत्थानासाठी आपली लेखणी आणि कला समर्पित केली पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या तडाखेबंद लेखणीने मातंग, शोषित आणि वंचित समाजाच्या व्यथा-वेदना साहित्यातून मांडल्या.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केले. 

Web Title: Describing the internationally reputed Annabhau literature: Lakshmikant Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे