देशपांडे विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:15 AM2021-08-17T04:15:40+5:302021-08-17T04:15:40+5:30
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्याला समृद्ध भारत निर्माण करायचा आहे. माणसाने माणसासारखे जर वागले, तर भारतीय संस्कृतीचा आदर्श ...
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्याला समृद्ध भारत निर्माण करायचा आहे. माणसाने माणसासारखे जर वागले, तर भारतीय संस्कृतीचा आदर्श जगासमोर राहील आणि तरुणांच्या कार्यक्षमतेवर भारत एक दिवस जागतिक महासत्ता बनेल, असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेद सय्यद यांनी व्यक्त केले. संस्था पदाधिकारी यांनी पाठवलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मुख्याधापकांनी वाचून दाखवल्या. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रसारण करून प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्था समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, संदीप देशपांडे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण, पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका अनिता तावर, पर्यवेक्षक राजाराम गावडे , धनंजय मेळकुंदे, शेखर जाधव तसेच शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, पालक वृंद उपस्थित होते.
देशपांडे माध्यमिक विद्यालयात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
१६०८२०२१-बारामती-०६