पुन्हा तुमच्यात येण्याची ओढ

By admin | Published: May 11, 2017 04:58 AM2017-05-11T04:58:22+5:302017-05-11T04:58:22+5:30

अभिनय करणे अथवा नाट्यागृहात बसून न आवडलेल्या नाटकाच्या प्रवेशावर टीका करण्याचा माझा पिंड आहे. मात्र, नाट्य संमेलनाध्यक्षाच्या

The desire to come back to you again | पुन्हा तुमच्यात येण्याची ओढ

पुन्हा तुमच्यात येण्याची ओढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अभिनय करणे अथवा नाट्यागृहात बसून न आवडलेल्या नाटकाच्या प्रवेशावर टीका करण्याचा माझा पिंड आहे. मात्र, नाट्य संमेलनाध्यक्षाच्या भूमिकेत असल्याने मी यापासून मुकलो आहे. केव्हा एकदा मी पुन्हा तुमच्यात येईन, याची ओढ लागली असल्याची भावना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी प्रेक्षक आणि रंगकर्मींना उद्देशून व्यक्त केली.
भरत नाट्य संशोधन मंदिराच्या वतीने आयोजित वासंतिक नाट्य महोत्सवाच्या बुधवारी झालेल्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी भाव व्यक्त केले. महापौर मुक्ता टिळक, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे, शिरीष फुले, रवींद्र वानकर या वेळी उपस्थित होते. या महोत्सवाची सुरुवात ‘संगीत सौभद्र’ या नाटकाने झाली.
भरत नाट्य मंदिरामध्येच विजय तेंडुलकर यांच्या ‘माणूस नावाचं बेट’ नाटकातून मी रंगमंचावर प्रथम पाऊल ठेवले. रंगमंचात एक तर मी समोर तरी बसतो अथवा रंगमंचावर असतो. मात्र, नाट्य संमेलनाध्यक्षाच्या भूमिकेमुळे या सर्वाला मुकलो आहे. नाट्यगृहात बसून नाटकातील न जमलेल्या भागावट टीका करण्याचा माझा पिंड आहे. आता असे केले, तर नाट्य संमेलनाचा अध्यक्ष, असा काय करतोय म्हणून माझ्याकडे पाहतील. त्यामुळे अध्यक्षपदाच्या सात महिन्यांचा कालावधी संपून कधी या व्यापातून मुक्त होतोय, असे झाले आहे.
नाट्यगृहाच्या परिस्थितीवर सावरकर म्हणाले, ‘‘नाट्यगृहाची स्थिती बदलणे ही केवळ सरकार, नाट्य अभिनेते आणि निर्मात्यांची नाही; त्याची जबाबदारी प्रेक्षकांवर अधिक येते. प्रेक्षक ५०० रुपये मोजून नाटकाला येतात. मोडक्या खुर्च्यांवर बसून ते नाटक पाहतात. त्यामुळे त्यांच्या नाट्यप्रेमाचे कौतुक करावे की तुटक्या खुर्च्यांचा साधा निषेधदेखील प्रेक्षक करीत नाहीत, याचे दु:ख मानायचे, हेच आता मला कळत नाही.’’

Web Title: The desire to come back to you again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.