पहिले लग्न होऊनही डॉक्टराकडून लग्नाचे आमिष; वेळोवेळी उकळले पैसे, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 10:31 IST2025-01-25T10:30:54+5:302025-01-25T10:31:01+5:30

अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, काही दिवसांनंतर तिला आपले आधीच लग्न झाले असून, पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले

Despite being married for the first time, the doctor lured her with marriage; Money was extracted from her time and again, the young woman took the extreme step | पहिले लग्न होऊनही डॉक्टराकडून लग्नाचे आमिष; वेळोवेळी उकळले पैसे, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

पहिले लग्न होऊनही डॉक्टराकडून लग्नाचे आमिष; वेळोवेळी उकळले पैसे, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

पुणे : पहिले लग्न झाले असतानाही लग्न जमवणाऱ्या वेबसाईटवर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याकडून वेळोवेळी १० लाख रुपये घेतले. काही दिवसांनंतर तिला आपले आधीच लग्न झाले असून, पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉ. पल्लवी पोपट फडतरे (२५) या तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणातील आरोपी डॉ. कुलदीप आदिनाथ सावंत (३०, रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जि. सांगली) याला नवी मुंबई येथून शोधून काढत अटक केली.

याप्रकरणी मृत पल्लवी यांच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. ही घटना बिबवेवाडीतील पीएमटी कॉलनी येथील तुळजाभवानी सोसायटीत ७ जानेवारी रोजी घडली होती. आरोपी कुलदीप सावंत याने लग्न झाले असतानाही विवाह विषयक संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे भासवून नोंदणी केली. त्याद्वारे त्याची पल्लवीशी ओळख झाली. तिला लग्नाचे आमिष दाखवत, कुलदीप याने तिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिने लग्नाचा विषय काढल्यावर आपले लग्न झाले असून, आपली पत्नी गर्भवती आहे, असे सांगितले. याचा तिला मोठा मानसिक धक्का बसला. पैसे देण्यासही तो टाळाटाळ करू लागला. तेव्हा तिने चिठ्ठी लिहून आपल्या क्लिनिकमध्ये विषारी औषध घेत आत्महत्या केली. बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी कुलदीप याच्यावर विश्वासघात, फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे, तपास अधिकारी पीएसआय शशांक जाधव, सहायक पोलिस फौजदार सोमनाथ सुतार, पोलिस कर्मचारी नीलेश खोमणे, सुमित ताकपेरे, अजय कामठे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले आणि प्रवीण पाटील यांनी केली.

Web Title: Despite being married for the first time, the doctor lured her with marriage; Money was extracted from her time and again, the young woman took the extreme step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.