खिशात पैसे असूनही भूक लागल्यावर खाता येईना!
By admin | Published: November 10, 2016 01:41 AM2016-11-10T01:41:40+5:302016-11-10T01:41:40+5:30
केंद्र शासनाने ५00 अन् १000 च्या नोटा बंद केल्याने बुधवारी नागरिकांची तारांबळ उडाली. खिशात पैसे अन् एटीएम, क्रेडिटकार्ड असूनही पोटाला दोन घास खाता येईना
कोरेगाव भीमा : केंद्र शासनाने ५00 अन् १000 च्या नोटा बंद केल्याने बुधवारी नागरिकांची तारांबळ उडाली. खिशात पैसे अन् एटीएम, क्रेडिटकार्ड असूनही पोटाला दोन घास खाता येईना, तर पेट्रोल भरण्यासाठी पाचशे रुपयाचेच पेट्रोल भरावे लागत होते. यामुळे त्यांना वादासही सामोरे जावे लागत होते.
सकाळी नागरिक हॉटेलात नाष्टा, जेवण करण्यासाठी गेले असता नाष्टा झाल्यावर पैसे देण्यासाठी हजार-पाचशेची नोट काढली असता, हॉटेलचालकाचेही बोलणे खावे लागले, तर काहींचे वादही हॉटेल मालकाशी झाले, तर काही हॉटेलात ‘येथे पाचशे व हजाराची नोट स्वीकारली जाणार
नाही’असे बोर्ड झळकल्याने भूक लागली असताना खिशात पैसे असूनही नाष्टा करायला मिळाला नसल्याने मोठी कुचंबणा झाली होती.
कोरेगाव भीमा-सणसवाडी बाजारपेठेत एकदम शुकशुकाट जाणवला. व्यवसायालाही फटका बसला असल्याचे अनेक व्यवसाय चालकांनी सांगितले.
पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी गेलेल्या वाहनचालकांना ‘पाचशे-हजाराच्या पटीतच पेट्रोल-डिझेल घ्या नाही, तर जावा ’ असे अरेरावीचे
उत्तर ऐकावे लागत असल्यानेही पेट्रोल पंपचालकांशी वादही आज मोठ्याप्रमाणावर झाले. (वार्ताहर)