लॉकडाऊन असला, तरी गुन्ह्यात नाही घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:04+5:302021-04-30T04:14:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जवळपास संपूर्ण एप्रिल महिना पुण्यात लॉकडाऊन असला, तरी गुन्ह्यांच्या संख्येत त्यामानाने घट झाल्याचे दिसून ...

Despite the lockdown, there was no drop in crime | लॉकडाऊन असला, तरी गुन्ह्यात नाही घट

लॉकडाऊन असला, तरी गुन्ह्यात नाही घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जवळपास संपूर्ण एप्रिल महिना पुण्यात लॉकडाऊन असला, तरी गुन्ह्यांच्या संख्येत त्यामानाने घट झाल्याचे दिसून येत नाही. लॉकडाऊनमुळे लोक घरात बसून आहेत. त्यामुळे घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. मात्र, वाहनचोरी, बलात्कार, अपहरण, विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी २३ मार्चपासून संपूर्ण देशात कडक लॉकडाऊन केला होता. तो सुरुवातीला २१ दिवस होता. त्यानंतर त्यात वाढ केली. या लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण व्यवहार ठप्प होते. जीवनावश्यक वस्तू वगळता कोणतीच दुकाने उघडी नव्हती. लोकांनीही स्वत:वर बंधने घालून घेतली होती. त्यामानाने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी शिथिलता आहे. पूर्वीपेक्षा लोकांचे बाहेर पडणे अधिक आहे. तसेच गेल्या वर्षी जसा रस्त्या, रस्त्यावर २४ तास कडक बंदोबस्त होता. तसा यंदा नाही. त्याचा परिणाम गुन्हे कमी झाले असले, तरी रात्री-अपरात्री चौकात जमणाऱ्या व भांडणे करण्यांमध्ये कमी झालेली नाही.

चोरीच्या घटनांमध्ये घट

सर्व प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा घट दिसून येत आहे. गेल्या वर्षी एप्रिल २०२० अखेर पुण्यात २७२ चोरीच्या घटना घडल्या होत्या. यंदा २८ एप्रिल अखेर २१३ चोरीच्या घटना घडल्या आहेत.

बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या अगोदर सर्वत्र खुलेपणा होता. मात्र, या वर्षी खुलेपणा असला, व्यवहार सुरु असला तरी शाळा, महाविद्यालये बंद होती. लोकांच्या फिरण्यावर, संपर्कावर बंधने होती. असे असतानाही गतवर्षीच्या तुलनेत या चार महिन्यांत बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एपिल २०२० अखेर बलात्काराच्या ४० घटनांची नोंद झाली होती. यंदा ही संख्या ६३ इतकी आहे.

शहरातील गुन्हेगारी

प्रकार २८ एप्रिल २१अखेर एप्रिल २० अखेर

खुन १९ १८

खुनाचा प्रयत्न ८६ २७

दरोडा ८ २

दरोड्याची तयारी९ ४

चेन स्रॅचिंग २८ ११

मोबाईल चोरी २६ ९

इतर जबरी चोरी २१ २२

घरफोडी १०७ १००

दुखापत ३१३ १०७

बलात्कार ६३ ४०

अपहरण १८९ १६४

विनयभंग १३२ १०७

फसवणूक २१९ १८७

चोरी २१३ २७२

वाहनचोरी ४५३ २६३

प्राणघातक अपघात ६० ५५

Web Title: Despite the lockdown, there was no drop in crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.