रुग्णसंख्या कमी होऊनही बेड मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:56+5:302021-04-23T04:11:56+5:30
पुणे : शहरात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या वाढीच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाºयांची संख्या अधिक आहे़ अशावेळी शहरातील विविध रूग्णालयांमधील खाटा ...
पुणे : शहरात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या वाढीच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाºयांची संख्या अधिक आहे़ अशावेळी शहरातील विविध रूग्णालयांमधील खाटा (बेड) रिक्त होणे अपेक्षित होते़ मात्र तसे अद्यापही झालेले नाही़
सद्यस्थितीला सौम्य लक्षणे असलेले व होम आयसोलेशेनमध्ये (गृह विलगीकरणात) असलेले कोरोनाबाधित १७ दिवसानंतर कोरोनामुक्त झाल्याचे महापालिकेकडून शहानिशा केल्यानंतर जाहीर करण्यात येत आहेत़ परंतु, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना अधिक कालावधी बरा होण्यास लागत आहे. याचबरोबर शहरासह शहराबाहेरील व अन्य जिल्ह्यातील कोरिनाबधितही दररोज शहरातील विविध खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूने आपले स्वरूप बदलले आहे असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे़ त्यानुसार अनेकांना या आजारातून मुक्त होण्यासाठी जास्तीचा अवधी लागत आहे़ त्यातच नव्या विषाणूचा मारा हा फुफुसावर अधिक प्रमाणात होत असून, यामुळे अनेकांना श्वसन विकार होत असल्याने त्यांना ॉऑक्सिजनची गरज बराच काळ लागत आहेत़ अन्य व्याधी असलेल्या कोरोनाबाधितांना अशा परिस्थितीत रूग्णालयांत दाखल करून घ्यावेच लागते़ यामुळे रूग्णालयांमधील संख्या, शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी कमी होताना दिसत नाही़,अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ़संजीव वावरे यांनी दिली़
----------------------------------------