पाच वर्षांत कोट्यवधी खर्च करूनही प्रश्न गंभीरच, समस्या ‘जैसे थे’च
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:36 AM2019-02-04T03:36:02+5:302019-02-04T03:36:21+5:30
पुणे : पुणे शहराच्या खऱ्या अर्थाने जीवनवाहिन्या असलेल्या मुळा-मुठा नदीसह शहराच्या सौंदर्यात भर घालणारे कात्रज, पाषाण तलाव जलपर्णीच्या वाढत्या ...
पुणे : पुणे शहराच्या खऱ्या अर्थाने जीवनवाहिन्या असलेल्या मुळा-मुठा नदीसह शहराच्या सौंदर्यात भर घालणारे कात्रज, पाषाण तलाव जलपर्णीच्या वाढत्या साम्राज्यामुळे मरणासन्न झाल्या आहेत. ही जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून गेल्या पाच वर्षांत तब्बल साडेतीन कोटीहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु, आजही ही समस्या कायम असून, खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे.
महापालिकेकडून शहरातील नदी, नाले व तलावांच्या स्वच्छतेसाठी व दर तीन-चार महिन्यांनी निर्माण होणाºया जलपर्णी काढण्यासाठी दर वर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते.
शहरातील मुळा-मुळा नदी आणि पाषण, कात्रज तलावतील जलपर्णी काढण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये दर वर्षी ६० ते ६५ लाख रुपयांची तरतूद केली जाते. जलपर्णी काढण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दर वर्षी
निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानंतर संबंधित ठेकेदार कोणत्याही आधुनिक पद्धतीचा वापर न करता मॅन्युअली जलपर्णी काढण्याचे काम केले जाते.
तसेच नदी, तलावांमध्ये थेट मोठ्या प्रमाणात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाही. यामुळे जलपर्णी काढल्यानंतर देखील काहीच
दिवसांत पुन्हा जलपर्णीचे साम्राज्य उभे राहात असल्याची वस्तूस्थिती
आहे. त्यामुळे महापालिकेने केलेला खर्च वाया जातो. नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत.
महापालिका
प्रशासन उदासीन
जलपर्णीमुळे दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव वाढत आहेत. याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे. जलपर्णी होऊ नये, म्हणून ठोस उपायांची गरज आहे. मात्र, त्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. ठोस उपाय योजून जलपर्णीला आळा घालण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जलपर्णीमुळे जलचरांचे अस्तित्व संपुष्टात
मुळा-मुठा नदी व कात्रज, पाषाण तालावांच्या पाण्याच्या प्रदूषणामध्ये दिवेसंदिवस वाढ होत असून, जलपर्णीची समस्या वाढतच आहे.
पाण्यावर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्यात आॅक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेत बाधा येत असून, पुरेसा सूर्यप्रकाशदेखील मिळत नाही. यामुळे पाण्यात असलेले जलचरांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.