Gram Panchayat Results in Pune : राज्यात सत्तांतर होऊनही राष्ट्रवादीने राखला मावळचा गड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 11:17 AM2022-12-21T11:17:30+5:302022-12-21T11:18:58+5:30

मावळात ९ पैकी ६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने विजय मिळविला...

Despite the transfer of power in the state, the NCP maintained the stronghold of Maval | Gram Panchayat Results in Pune : राज्यात सत्तांतर होऊनही राष्ट्रवादीने राखला मावळचा गड

Gram Panchayat Results in Pune : राज्यात सत्तांतर होऊनही राष्ट्रवादीने राखला मावळचा गड

googlenewsNext

वडगाव मावळ (पुणे) :मावळात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले होते. राज्यातील मंत्री प्रचाराला येऊनही मावळात ९ पैकी ६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने विजय मिळविला. कुणेनामा, गोडुंब्रे आणि भोयरे या तीन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात राहिल्या आहेत. त्यामुळे राज्यात सत्ता बदल होऊनही राष्ट्रवादीला मावळचा गड राखता आला.

मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे नेते गावोगाव फिरले. विद्यमान आमदार सुनील शेळके व माजीमंत्री बाळा भेगडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारात भाजपचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सहभाग घेतला होता. भाजपचे राज्यातील नेते, पालकमंत्री व माजीमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी निवडणुकीच्या प्रचाराला धुराळा उडविला होता. त्यानंतरही मावळातील नऊपैकी भाजपला तीन ग्रामपंचायतीत विजय मिळविता आला.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, दीपक हुलावळे, नारायण ठाकर, संदीप आंद्रे, देवा गायकवाड व पदाधिकारी यांनी प्रचार केला. या निवडणुकीत सहा ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, भोयरेत बंडखोरी झाल्याने राष्ट्रवादीला फटका बसला आहे. त्याठिकाणी भाजपला विजय मिळाला.

शिंदे गटाचे पदाधिकारी तटस्थ...

राज्यात बंडखोरी झाल्यानंतर मावळमधील मूळ शिवसेनेतील अनेक पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले. या निवडणुकीत तालुक्यात उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीबरोबर सक्रिय होता. त्यांचे अनेक ठिकाणी सदस्य निवडून आले आहेत. तर शिंदे गटाचा एकही सदस्य रिंगणात नसल्याने या निवडणुकीत त्यांना अस्तित्व दाखविता आले नाही.

Web Title: Despite the transfer of power in the state, the NCP maintained the stronghold of Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.