धोकादायक मिळकती जमीनदोस्त करा : राजेंद्र मेहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:14 AM2021-09-15T04:14:43+5:302021-09-15T04:14:43+5:30
वारुळवाडी परिसरातील एकूण ६ वॉर्डांत अनेक मिळकती या जुन्या, जीर्ण, मोडकळीस आल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यासंबंधी कोणतीही कार्यवाही मिळकतधारक ...
वारुळवाडी परिसरातील एकूण ६ वॉर्डांत अनेक मिळकती या जुन्या, जीर्ण, मोडकळीस आल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यासंबंधी कोणतीही कार्यवाही मिळकतधारक करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व मिळकतधारकांनी लवकरात लवकर सदर मिळकतीची दुरुस्ती व डागडुजी करून घ्यावी, तसेच मिळकतीचा धोकादायक भाग स्वखर्चाने पाडून घ्यावा, अन्यथा मिळकतीचा धोकादायक भाग कोसळून नुकसान झाल्यास व कोणतीही जीवितहानी झाल्यास मिळकतीचे मालक हे संपूर्णतः कायदेशीररीत्या जबाबदार राहील. अनेक मिळकतीचे जुने बांधकाम पडले असून त्यामध्ये घुशी ,उंदीर ,डुक्कर ,साप यांचे वास्तव्य असल्याने नागरिकांच्या आरोग्याला त्यापासून धोका निर्माण होऊ शकतो अशा मिळकतीधारकांवर ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन सरपंच सरपंच राजेंद्र मेहेर यांनी केले आहे.