महापालिकेच्या वाहन ताफ्यातील तपशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:17 AM2021-02-23T04:17:49+5:302021-02-23T04:17:49+5:30
------ घनकचरा विभागाकडील गाड्यांचा तपशील २५ ते ३० वर्षापूर्वीच्या गाड्या : १८ २० ते २५ वर्षापूर्वीच्या गाड्या : ५८ ...
------
घनकचरा विभागाकडील गाड्यांचा तपशील
२५ ते ३० वर्षापूर्वीच्या गाड्या : १८
२० ते २५ वर्षापूर्वीच्या गाड्या : ५८
१५ ते २० वर्षापूर्वीच्या गाड्या : ५१
१० ते १५ वर्षापूर्वीच्या गाड्या : १२०
५ ते १० वर्षापूर्वीच्या गाड्या : २२५
१ ते ५ वर्षापूर्वीच्या गाड्या : २४६
---------------------
घनकचरा विभाग वगळता अन्य विभागाकडील गाड्या
२५ ते ३० वर्षापूर्वीच्या गाड्या : २६
२० ते २५ वर्षापूर्वीच्या गाड्या : १२४
१५ ते २० वर्षापूर्वीच्या गाड्या : १२०
१० ते १५ वर्षापूर्वीच्या गाड्या : २०६
५ ते १० वर्षापूर्वीच्या गाड्या : ३९१
१ ते ५ वर्षापूर्वीच्या गाड्या : ३७८
-----------------------------
चौकट १
पुणे महापालिकेच्या वाहन विभागातील नोंदीनुसार एकूण १ हजार ९६३ लहान मोठ्या वाहनांपैकी केवळ ६२४ वाहने ही १ ते ५ वर्षांमधील म्हणजेच पात्र आहेत़ तर केंद्राच्या नवीन नियमानुसार सन २००७ पूर्वीच्या म्हणजे पंधरा वर्षापूर्वीच्या सर्व गाड्या भंगारात निघणार आहेत़ अशावेळी महापालिकेची कार्यपध्दती पाहता निविदा प्रक्रिया, पुरवठा यामध्ये महिनोंमहिने जाणार आहेत़ याचा सर्वाधिक फटका हा शहरातील कचरा उचलण्याच्या कामावर होणार आहे़ त्यातच ३५ ते ४० लाखापर्यंत जाणारी मोठी वाहने कचरा विभागात अवघ्या सहा सात वर्षात खराब होत असल्याने, याकडेही गाभिर्याने पाहणे जरूरी आहे़
-----------------------
केंद्र सरकारच्या निर्णय पाहता पुणे महापालिकेकडील सर्व वाहनांचा तपशील मागविला आहे़ यामध्ये ज्या विभागाकडील विशेषत: घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील पंधरा वर्षे जुन्या गाड्यांची संख्या लक्षात घेऊन, प्रशासनाला पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत़ वाहनांविना महापालिकेच्या कुठल्याही कामांचा खोळंबा होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल़
- हेमंत रासने,
अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका
-----------------------
फोटो मेल केला आहे़